बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता सलमान खान मन्नत येथील किंग खानच्या घरी पोहोचला आहे. सलमान शाहरुखच्या घरी पोहोचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सलमान खान हा शाहरुख आणि कुटुंबाशी आर्यनबद्दल बोलण्यासाठी आला आहे.

NCB ने मुंबईजवळील 'Cordelia the Impress' क्रूझवर छापा टाकला, त्या पार्टीत जवळपास 600 लोक उपस्थित होते. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात 3 मुलींचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)