Shah Rukh Khan Gets Death Threat: सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या; मन्नतची सुरक्षा वाढवली, पोलीस कारवाईत

फैजानची 1-2 तास चौकशी केली. त्याचे निवेदन नोंदवून घेतल्यानंतर त्याला 14 नोव्हेंबरला मुंबईला बोलावले आहे. फैजानच्या नंबरवरून 5 नोव्हेंबरला वांद्रे पोलीस स्टेशनला कॉल आला होता,

Shah Rukh Khan Gets Death Threat: सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या; मन्नतची सुरक्षा वाढवली, पोलीस कारवाईत
शाहरुख खान, अभिनेता (Photo credits: IamSRK/facebook)

Shah Rukh Khan Gets Death Threat: सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी क्राईम ब्रँचने रायपूर येथील फैजान खान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याने सांगितले की, त्याच्या चोरीच्या फोनवरून धमकावण्यात आले असून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली असावी. याबाबत फैजानने सांगितले की, 2 नोव्हेंबरला त्याचा फोन चोरीला गेला, त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पुढे 5 नोव्हेंबर रोजी कोणीतरी त्या फोनवरून शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस रायपूरला गेले. त्यांनी फैजानची 1-2 तास चौकशी केली. त्याचे निवेदन नोंदवून घेतल्यानंतर त्याला 14 नोव्हेंबरला मुंबईला बोलावले आहे. फैजानच्या नंबरवरून 5 नोव्हेंबरला वांद्रे पोलीस स्टेशनला कॉल आला होता, त्या आधारे वांद्रे पोलीस रायपूरला पोहोचले. शाहरुखच्या आधी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत पोलीस आता सतर्क झाले असून अभिनेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा: Salman Khan Death Threat Case: सलमान खानला धमकी देत 5 कोटीची मागणी प्रकरणी 32 वर्षीय Bikaram Jalaram Bishnoi ला कर्नाटक मधून अटक)

शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2024 06:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).