महिला प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या सत्रात दररोज रोमांचक सामने होत आहेत. आज या मोसमातील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तत्पूर्वी, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात जायंट्स संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून भारती फुलमलीने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे, मारिजाने कॅप आणि मिन्नू मणी यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने अवघ्या 13 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. गुजरात जायंट्सकडून तनुजा कंवरने सर्वाधिक एक विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)