Shah Rukh Khan Greets Devoted Fan: शाहरुख खानच्या जबरा चाहत्याची इच्छा पूर्ण; 95 दिवस 'मन्नत'बाहेर थांबलेल्या व्यक्तीची किंग खानने घेतली भेट
झारखंडहून मुंबईत पोहोचलेल्या या चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि त्याला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली. आता या डाय हार्ड फॅन मोहम्मद अन्सारीचा शाहरुख खानसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan Greets Devoted Fan: शाहरुख खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. यामध्ये स्थानिक आणि परदेशी चाहत्यांचा समावेश आहे. जगभरात शाहरुख खानची क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस होता, तिथे खुल्या आकाशाखाली शाहरुख खानचे स्टारडम पाहायला मिळाले. शाहरुख खानचे चाहते मन्नतच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. यामध्ये एक चाहता असाही होता जो गेल्या 95 दिवसांपासून त्याचा सर्वात आवडता अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची वाट पाहत होता. झारखंडहून मुंबईत पोहोचलेल्या या चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि त्याला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली. आता या डाय हार्ड फॅन मोहम्मद अन्सारीचा शाहरुख खानसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा हा झारखंडी चाहता गेल्या 94 दिवसांपासून मन्नतच्या बाहेर 'किंग खान'ची झलक पाहण्याची वाट पाहत होता आणि शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी मोहम्मद अन्सारीला त्याच्या आवडत्या स्टारची झलक पाहायला मिळाली. यासह त्याची शाहरुख खानशी भेटही झाली. (हेही वाचा: SRK Quits Smoking: एकेकाळी 100 सिगारेट्स पिणार्या Shah Rukh Khan ने धुम्रपानाची सवय सोडल्याची दिली कबुली)
शाहरुख खानने घेतली त्याच्या चाहत्याची भेट:
A fan, who literally waited outside Shah Rukh Khan's residence Mannat for 95 days to catch a glimpse of the superstar, finally got the golden chance to meet King Khan, and that too on his 59th birthday.#ShahRukhKhan #SRK #Mannat #Fan #SRKFan #Birthday #KingKhan #SRKBirthday pic.twitter.com/kWBthawA6y
— India Today NE (@IndiaTodayNE) November 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2024 09:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

