Imran Khan Bollywood Comeback:  बॉलिवूडचा अभिनेता इम्रान खान बॉलिवूड क्षेत्रात पुन्हा पदार्पण करणार आहे. त्यामुळे इम्रान खानच्याय चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. इम्रान खान यांनीं बालकलाकार म्हणून आमिर खान यांच्या कयामत से कयामत तक यात झळकले होते. त्यानंतर २००८ मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटात त्यांनी मुख्य भुमिकेत काम केले. पुन्हा नव्याने त्याचा करियरची सुरुवात बॉलिवूडमधून करत आहे. त्यामुळे आता आमिर खान यांच्या चित्रपटात दिसणार आहे. इम्रानने त्यांच्या कमबॅक प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. आमिर खान प्रॉडक्शन निर्मित हॅपी पटेल या कॉमेडी चित्रपटात तो काम करणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच शुटींग गोव्यात सुरु झाले आहे. हेही वाचा- जॉली विरुद्ध जॉली; जॉली एलएलबी थ्री सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)