जॉली एलएलबी (Jolly LLB) च्या पहिल्या भागात अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) काम केलं होतं तर दुसऱ्या भागात अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका होती. हे दोन्ही सिनेमे खूप गाजले आणि आता जॉली एलएलबी थ्री हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पुन्हा एकदा अर्शद वारसी या सिरीज मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हर्षद वारसी या सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानला रवाना होणार आहे. सिनेमाचं पूर्ण शूटिंग राजस्थानमध्ये पार पडणार आहे. (हेही वाचा - Ramayana Movie: रामायण सिनेमाच्या सेटवरील रणबीर आणि साई पल्लवीचा लूक समोर)
जॉली एलएलबी 3 चं सुभाष कपूर करणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी कोर्टात जॉली विरुद्ध जॉली अशी लढाई रंगणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारही दुसऱ्या जॉलीच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या दोन्ही सिनेमांमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते सौरभ शुक्ला या सिनेमातही त्यांची ही गाजलेली भूमिका साकारणार आहेत.
जॉली एलएलबीचा पहिला भाग ज्यात अर्शद मुख्य भूमिकेत होता तो उत्तम गाजला होता तर अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या दुसऱ्या भागालाही उत्तम व्यावसायिक यश मिळालं होतं. टीकाकारांनी सुद्धा या सिनेमाचं कौतुक केलं होतं. तर सिनेमाचा स्क्रीनप्ले आणि कथानकाची मांडणी सगळ्यांना आवडली होती. अक्षय कुमारची केप ऑफ गुड फिल्म्स ही संस्था या सिनेमाची निर्मिती करणार असून डिझ्ने या सिनेमाची सहनिर्मिती करणार आहे.