Bade Miyan Chote Miyan on Netflix: अक्षय कुमार(Akshay Kumar)आणि टायगर श्रॉफ(Tiger Shroff) स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' उद्या, ६ जूनपासून OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix ) वर चाहत्यांसाठी उपलब्ध होतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्याशिवाय या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचा रिमेक आहे असे म्हटले जात आहे. मात्र, या चित्रपटाचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही असे चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात येत आहे. (हेही वाचा:Kalki 2898 AD Trailer Update: प्रभास-दीपिका पदुकोण स्टारर 'कल्की 2898 एडी' चा ट्रेलर 10 जूनला होणार रिलीज; 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला )

उद्या नेटफ्लिक्सवर बडे मियाँ छोटे मियाँ प्रीमियर:

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)