World's Biggest Pumpkin | (Photo Credit: Instagram)

भोपळा (Pumpkin) किती किलो वजनाचा असतो? असे विचारले तर कोणीही उत्तर देईल की 1,2,3, किंवा फार फार तर 5 तो 10 किलो वजनाचा. पण तुम्ही कधी 10 क्विटंट वजनाचा भोपळा असतो असे ऐकले आहे का? कदाचित नसेल. कदाचित काय.. नक्कीच नसेल. कारण असा भोपळा कुठे पिकलाच नव्हता. पण, अमेरिकेतील एका शेतकऱ्याने ही जादू करुन दाखवली आहे. या बहाद्दर शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क 10 क्विटल इतक्या वजनाचा भोपळा पिकवला आहे. जगातिल सर्वात मोठा भोपळा (Worlds Biggest Pumpkin) म्हणून याची नोंद घेण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या भोपळ्याच्या उत्पादनामुळे या शेतकऱ्याच्या नावावर जागतिक विक्रम (World Record) नोंदला गेला आहे. सशल मीडियावर या भल्यामोठ्या भोपळ्याचे फोटो पोस्ट करताच जोरात व्हायरल झाले आहेत. या भोपळ्याचा आकार आणि लांबी पाहून लोक आश्चर्यचकीत होत आहेत.

अमेरिकेतील ओहयो येथील शेतकऱ्याने ही किमया केली आहे. दोन शेतकऱ्यांनी मिळून हा भोपळा उगवला आहे. टॉड आणि डोना स्किनर अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे पाठीमागील 30 वर्षांपासून शेती करतात. त्यांची इच्छा होती की, आपण आपल्या शेतात असा भोपळा पिकवू की ज्याची जग नोंद घेईल. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी 10 क्विंटलचा भोपळा बनवला. दोघांनी मिळून 2164 पाऊंड म्हणजेच जवळपास 1000 किलोग्रॅम इतक्या वजनाचा भलामोठा भोपळा उत्पादीत केला. डबलीन येथे सुरु असलेल्या कृषी उत्पादन स्पर्धेत त्यांनी आपला भोपळा प्रदर्शनासाठी ठेवला आहे. ज्याची जगाने दखल घेतली आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी सांगितले की, भोपळ्याच्या वजनाचा आम्हाला अंदाज आला होता. त्यमुळे आम्ही ऑकलँड नर्सरीकडे नोंदणी केली आणि आम्ही जगातील सर्वात मोठा भोपळा उत्पादीत करणारे शेतकरी ठरलो. (हेही वाचा, Happy Halloween: हॅलोविन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या सेलिब्रेशन बाबत '7' इंटरेस्टिंग गोष्टी)

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Oakland Nursery (@oaklandnurseries)

भारत हा कृषीप्रधान देश. भारतातील जवळपास 60% पेक्षा अधिक लोक शेती करतात. जगभरातही अनेक देशांमध्ये शेती केली जाते. शेतकरी म्हटलं की त्याचे काम एकच. शेती करणे आणि अन्नधान्य पिकवणे. मग जगातील तो कोणताही शेतकरी असो. दरम्यान, पारंपारीक शेती तर सगळेच करतात. पण काही शेतकरी असतात ते आपल्या शेतीत काहीसे वेगळे प्रयोग करतात. अमेरिकेतील शेतकऱ्यांनीही असाच एक प्रयोग केला. ज्यामुळे त्यांची जागतिक विक्रम म्हणूनही नोंद केली गेली आहे.