Wife Try To Kiss Husband: लाईव्ह मीटिंगमध्ये बायकोला हवा नवऱ्याचा मुका, 'Work From Home' धोक्यात; Video  व्हायरल
Work From Home | | ( (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन या दोन गोष्टींमुळे वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही संकल्पना जगाला नव्याने मिळाली. वर्क फ्रॉम होम असताना अनेकदा कार्यालयीन कामसाठी आयोजित मीटिंगही ऑनलाईनच घ्याव्या लागतात. अशा वेळी लाईव्ह मीटिंग (Live Meeting) सुरु असताना घडणारे किस्सेही काही औरच असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत झूमवर लाईव्ह मीटिंग सुरु असताना एका अथिकाऱ्याच्या पत्नीने त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला (Wife Try To Kiss Husband) . आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Officer Rupin Sharma) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, हा अधिकारी लाईव्ह मीटिंगमध्ये एका प्रकल्पाबाबत प्रेजेंटेशन देत आहे. लाईव्ह प्रेजेंटेशन सुरु असतानाच या अधिकाऱ्याची पत्नी येते आणि त्याचे चुंबण घेण्याचा प्रयत्न करते. या वेळी हा अधिकारी काहीसा मागे सरतो आणि तिला म्हणतो 'अरे... मी ऑन एअर आहे. हे काय चाललंय तुझं'. मग पत्नीलाही तिने केलेले कृत्य लक्षात येते आणि तिही असते आणि बाजूला जाते. मग पती पुन्हा मीटिंगमध्ये सहभागी होतो. (हेही वाचा, नवऱ्याकडे जाण्यासाठी ढसाढसा रडतेय 'ही' चिमुरडी; पहा मजेशीर Viral Video)

ट्विट

रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'वर्क फ्रॉमचे धोके'. रिुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ 13 फेब्रुवारीला शेअर केला होता. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच त्यावर शेकडो कमेंट्स आणि लाईक्सही आल्या आहेत. लोकांनाही हा व्हिडिओ प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते आहे. एका यूजरने मिश्लीलपणे प्रतिक्रिया दिली आहेे की, जेव्हापण व्हिडिओ कॉन्फरन्स करायची असेल तर तुमची खोली बंद करा. नाहीतर सांगवेल लागेल की संबंधित व्यक्तीची ती लग्नाची बायको आहे.