Viral Video (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर सातत्याने नवनवे व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही मजेशीर व्हिडिओ आपल्याला नक्कीच हसवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगी चक्क पतीकडे जाण्याचा हट्ट करत आहे. नवऱ्याकडे जाण्यासाठी ही मुलगी ढसाढसा रडत आहे. तिचा हा बालहट्ट पाहून तुम्हाला नक्कीच हसू फुटेल. 56 सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अनेकांचे मन जिंकत आहे. यावर प्रतिक्रीयांचा वर्षाव होत आहे. तर या क्युट चिमुरडीच्या नेटकरी प्रेमात पडले आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एक 3-4 वर्षांची मुलगी गॉगलसोबत खेळत आहे आणि आपल्या नवऱ्याकडे जाण्याचा हट्ट करत आहेत. त्यानंतर घरातील महिला तिला समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र ती काही आपला हट्ट सोडायला तयार नाही. तुम्हालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

पहा व्हिडिओ:

घरातल्या मोठ्यांना ती सांगते की, मला माझ्या पतीकडे जायचे आहे. पती कोण असतो असे विचारताच मामा असं ती म्हणते. त्यानंतर मामा मामीचा पती आहे. पप्पा मम्मीचे पती आहेत, अशी तिची समजूत घालण्यात येते. यावर ती लहान मुलगी रडत सांगते की, मग माझे पती कोण आहेत? यावर महिला सांगते की, तो कुठेतरी खेळत असेल. आता नाही भेटणार तो. लहान मुलींचा नवरा नसतो. लहान मुलांची भांवंड असतात. अशी समजूत घालूनही या चिमुकलीचा निरागस हट्ट चालूच राहतो.