Female Employees and Boss: महिला कर्मचाऱ्याच्या बेडरुमध्ये घुसला बॉस
Sleeping Woman | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Boss With Female Employees: कामावरुन रजा घेणे ही तशी सामान्य बाब. काही प्रमाणात तो कर्मचाऱ्याचा हक्कसुद्धा. पण, काही प्रकरणांमध्ये रजा मंजूर करणारे बॉस लोक भलताच रुबाब करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे सुट्टी मागणे किंवा रजा घेणे काहीसे अवघडलेपणाचे ठरु शकते. असे घडले तर ते ठिक पण जर एखाद बॉस रजा घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचला तर? होय, असे घडले आहे. एका महिला कर्मचाऱ्याने आजारी असल्याचे सांगून रजा घेतली. तर, तिचा बॉस चक्क तिच्या बेडरुमध्ये (Employees Boss Enters Female Employees Bedroom) घुसला. महिला कर्मचाऱ्याने आपल्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. ज्यामुळे नेटीझन्सनी तीव्र नापसंती दर्शवली आहे.

मिश असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. तिने आपल्या @mishyymbabyy या सोशल मीडिया हँडलवर तिच्यासोबत घडलेली घटना कथन केली. तिने म्हटले आहे की, आपण आजारी असल्याचे सांगून रितसर रजा घेतली होती. रजेवर असल्यामुळे आपण आपल्या बेडरुममध्ये आराम करत होतो. या वेळी अचानक पाहिले तेव्हा आपल्या बेडच्या बाजूला कोणीतरी उभे असल्याचे आपल्याला दिसले. आपण निरखून पाहिले तर तो आपला बॉस होता. महिला कर्मचाऱ्याने एक शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिच्या पलंगाजवळ उभा असल्याचे पाहायला मिळते. धक्कादायक म्हणजे तिने दावा केला आहे की, तिचा बॉस ती आजारी असतानाही तिला कामावर घेऊन जाण्यासाठी आला होता. (हेही वाचा, New Mumbai: तुर्भे येथे अमेरिकन नागरिकाकडून महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ; आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिलेने स्पष्ट केले की तिच्या घरातील सदस्याने घरातून बाहेर पडताना अनवधानाने दरवाजा उघडा ठेवला होता. ज्यामुळे तिचा बॉस चक्क तिच्या घरात प्रवेशकर्ता झाला आणि तिच्या बेडरुमपर्यंत पोहोचला. त्याने आपल्या खासगी जागे घुसखोरी केली, असेही महिलेने म्हटले आहे. बॉसच्या या घुसखोरीबद्दल आपणास धक्का बसला असून आपण यापुढे त्याच्यासोबत काम करणार नसल्याचेही तिने जाहीर केले आहे.

दरम्यान, महिलेने कथन केलेल्या प्रसंगानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला. बॉसचे हे वर्तन अनपेक्षीत आणि व्यक्तीच्या खासगी स्वातंत्र्य, गोपनियता आणि सामाजिक संकेतांचा भंग करणारे असल्याचे काहींनी म्हटले आहे. नेटिझन्सनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करताना मिशच्या गोपनीयतेच्या अधिकारावर जोर दिला आणि बॉसने त्याच्या मर्यादांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल निषेध केला. काहींनी मिशलायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला. कामाच्या ठिकाणी छळवणूक आणि कर्मचाऱ्यांचे हक्क आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी कठोर उपायांची आवश्यकता असल्याचे मत अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे.