Woman Ate Bat Soup: थायलंडमधील (Thailand) एका महिलेला वटवाघळाचं सूप (Bat Soup) प्यायल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेने सूप पितानाचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तसेच या प्रकरणी महिला शिक्षिका असणाऱ्या या महिलेला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. यासोबतच £12,000 इतका दंडही भरावा लागेल.
महिलेने हा व्हिडिओ तिच्या फेसबुक पेज किन साब नुआ नुआवर पोस्ट केला होता. या पेजचे 3,92,000 फॉलोअर्स आहेत. व्हिडिओमध्ये, श्रीसुनाक्लुआ ही आशियाई पिवळ्या वटवाघूळाचे पंख पसरवताना दिसत आहेत. वटवाघूळ खाण्यासाठी ती त्याचे पंख काढून टाकताना दिसत आहे. उत्तर थायलंडमधील लाओस सीमेजवळील एका बाजारात तिने वटवाघूळ खरेदी केले. (हेही वाचा -Nose Transplant Surgery: आश्चर्यजनक! फ्रान्समध्ये विचित्र शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी रुग्णाच्या हातावर वाढवलेल्या नाकाचं केलं चेहऱ्यावर प्रत्यारोपण)
महिलेने केला कोरोना विषाणूचा उल्लेख -
महिलेने मसालेदार सूपच्या भांड्यात उकळलेल्या वटवाघुळांचे वर्णन “स्वादिष्ट” असे केले. तसेच तिने पहिल्यांदाच वटवाघूळ खाल्ल्याचे सांगितले. तिने पुढे बोलताना सांगितले की, वटवाघूळाच्या नखांना उंदरासारखा वास येत होता आणि त्याची त्वचा चिकट झाली होती. तिने व्हिडिओमघध्ये लोकांना सांगितले की, ती कोणत्याही कोरोनाव्हायरस पसरवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तिच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांनीही वटवाघुळ खाल्लेले होते.
तथापि, अनेक यूजर्संनी व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंन्ट केल्या आहेत. तसेच नवीन रोगांचा प्रसार होण्याचा धोकाही वर्तवला आहे. एका युजरने म्हटले की, "जर तुम्ही मरणार असाल तर एकटेच मरा. तुम्हाला कोणीही दोष देणार नाही. पण जर तुम्ही महामारी सुरू केली तर तुम्हाला खूप त्रास होईल."
क्लिप व्हायरल झाल्यानंतर, रोग नियंत्रण विभागाने (DDC) लोकांना आरोग्याच्या चिंतेमुळे वटवाघुळ न खाण्याचा इशारा दिला. DDC मधील एपिडेमियोलॉजी विभागाचे संचालक डॉ. चक्ररत पिट्टायावोंग म्हणाले की, वटवाघळांपासून मनुष्य सहजपणे रोग पसरवू शकतो. त्याच्या विष्ठेमुळे श्वासोच्छवासात संसर्ग होऊ शकतो.