Bihari Tarzan Raja Yadav | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Fitness Influencer Viral Videos: इंटरनेटवर एका व्यक्तीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे आंतरजालाला चक्क स्वतःचा टार्झन सापडला असल्याचा दावा केला जात आहे. तो देखील आफ्रिकन जंगलात नव्हे तर, बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात. फिटनेस उत्साही आणि सोशल मीडिया प्रभावक राजा यादव () याचे हे व्हिडिओ असून, लोकांनी त्यालाच टारझन संबोधण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओत दिसणारी त्याची असाधारण शक्ती, वेग आणि चपळता आदी गुणांनी वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामुळे लोक त्याला प्रेमाणे 'बिहार टार्झन' (Bihar Tarzan) म्हणूत आहेत.

राजा यादव याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या 'राजा यादव फिटनेस' या पोस्टने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. ज्याची तुलना जुन्या काळातील प्रसिद्ध टार्झन पात्राशी केली जाते. राजा यादवचे व्हायरल व्हिडिओ हे सामान्य फिटनेस क्लिप नाहीत; त्यात तो थार आणि स्कॉर्पियो सारख्या लोकप्रिय मॉडेल्ससह एस. यू. व्ही. सोबत शर्यतीत भाग घेताना दाखवण्यात आला आहे. ज्यात व्यावसायिक खेळाडूंशी स्पर्धा करणारी ऊर्जा आणि सहनशक्ती आहे. "तुमच्याकडे बिबट्याचा वेग आहे" ते "कठोर परिश्रम करत रहा, तुम्ही खूप पुढे जाल" अशा टिप्पण्यांसह चाहते त्याच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक करताना दिसतात. प्रत्येक नवीन पोस्टला हजारो व्ह्यूज आणि उत्साही प्रतिक्रिया मिळत असल्याने त्याच्याबाबत आकर्षण दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. (हेही वाचा, Diwali 2024: वृद्ध आजीचा हातात फटाके फोडण्याची कला पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल)

राजा यादव व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Raja Yadav (@raja_yadav_fitness)

बिहारमध्ये वाढलेल्या राजा यादवने आपली स्थानिक मुळे आणि तंदुरुस्तीसाठीच्या समर्पणाला सोशल मीडियाच्या प्रक्रियेत रूपांतरित केले आहे. ज्यामुळे भारतभरातील अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. पश्चिम चंपारणपासून डिजिटल मंचावर प्रसिद्ध व्यक्ती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रादेशिक प्रतिभा जागतिक मंचावर कशी चमकू शकते असे अनेकांना वाटते. त्याची अनोखी शैली आणि अविचल वचनबद्धतेमुळे, बिहारची स्वतःची टार्झन लाट निर्माण करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raja Yadav (@raja_yadav_fitness)

राजा यादव याचा धावतानाचा आणखीएक व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Raja Yadav (@raja_yadav_fitness)

स्मार्टफोनची क्रांती झाल्यापासून इंटरनेट सेवा नागरिकांच्या हातात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना एक नवी कवाडे उघडली आहेत. नागरिकांच्या प्रतिभेला नवा आकार आला आहे. त्यामुळे लोक टिक टॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, एक्स यांसारख्या विविध सोशल मीडिया मंचावरुन व्यक्त होत आहेत. यामध्ये व्हिडिओ छायाचित्रे आणि त्यांनी नानावीध प्रकारांनी केलेली सादरीकरणे असतात. अर्थात अनेक लोक ही प्रतिभा व्यक्त करताना टीकेचे धनीही होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावरील स्टार वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात.