Fact Check: कोरोना व्हायरस संकटाचा फायदा घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्यांची कमी नाही. कोरोना व्हायरसबाब दिशाभूल करणारी माहिती, अफवा, संदेश पसरवल्याबद्दल अनेकांवर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाईही केली आहे. तरीही, अशा घटना सुरुच आहेत. Norbert Elekes नावाच्या व्यक्तीने @xDDDGuy या ट्विटर अकाऊंटवरुन अशाच प्रकारचे एक ट्विट आज (7 एप्रिल 2020) केले आहे. ज्यात ''जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जगातील सर्वात उत्कृष्ट मुंख्यमंत्री म्हटले आहे, असा दावा केला आहे''. लेटेस्टलीने या दाव्याची सत्यता तपासली असता त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पुढे आले.
नोबर्ट एलेक्स याने ट्विटर अकाऊंटवर आपला परिचय देताना म्हटले आहे की, तो एक Data storyteller, विज्ञान, तंत्रज्ञान यावर लिहिणारा व्यक्ती आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर कोरोना व्हायरस बाबात विविध आकडेवारी दिली आहे. तिचा तपशील तपसला असता त्याचीही पुष्टी होऊ शकली नाही. तसेच, त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जो दावा केला आहे. त्याचाही तपशील मिळू शकला नाही. आता तर ते ट्विटही त्याने आपल्या अकाऊंटवरुन काढून टाकले आहे. (हेही वाचा, Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #9PM9Minutes या उपक्रमावेळी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या नासा उपग्रहाच्या फोटोंमागील सत्य जाणून घ्या सविस्तर)
It is high time @NorbertElekes gets a #bluetick on #Twitter! #FakeNews #FakeInformation #UddhavThackeray #WHO #fakeaccount #coronavirus #Covid_19 @xDDDGuy https://t.co/ADZEWsvo0M
— LatestLY (@latestly) April 7, 2020
दरम्यान, नोबर्ट एलेक्स याने हे ट्विट का केले, याबाबतही माहिती मिळू शकली नाही. मात्र, कोरोना व्हायरस बाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडिया अथवा इतर कोणत्याही माध्यमातून पसरवल्यास महाराष्ट्र पोलीस त्याविरोधात कडक कारवाई करताना दिसत आहेत. राज्यातील अनेक लोकांवर अशी कारवाई करण्यातही आली आहे.