Video: युवकाचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न; CRPF जवानामुळे थोडक्यात वाचले प्राण
Charminar Express CCTV Footage Image | (Photo Credits: ANI)

हैदराबाद रेल्वे स्टेशन (Hyderabad Railway Station) फलाटावर एका युवकाला आरपीएफ (Railway Protection Force) जवानामुळे जीवदान मिळाले आहे. हे दृश्य स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात गुरुवारी (29 ऑगस्ट 2019) कौद झाले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक युवक हैदराबाद रेल्वे स्टेशनवरुन धावत असलेल्या चारमीनार एक्सप्रेस (Charminar Express) गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, त्याचा पाय गाडी आणि फलाट यांच्यामध्ये असलेल्या रिकाम्या जागेत अडकला आणि तो फलाटावरुन गाडीसोबत फरफटत निघाला. ही घटना एका सीआरपीएफ जवानाच्या नजरेस पडली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या युवकाला पकडले आणि फलाटावर खेचले. युवकाला वाचविण्यात पोलिसाला यश आले.

दरम्यान, या घटनेत युवकाचे प्राण वाचले. मात्र, तो जबर जखमी झाला. फलाटावर लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना विविध कोनातून चित्रीत झाली आहे. जखमी झालेल्या युवकाचे नाव वेंकट रेड्डी असे आहे. तो चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा पाय घसरला आणि तो गाडीसोबत फलाटावर फरपटू लागला. (हेही वाचा, रेल्वे अपघात टाळण्यासाठी चर्चगेट स्थानकात नवे बफर्स; कसे काम करणार हे बफर्स?)

एएनआयने ट्विट केलेले सीसीटीव्ही फुटेज

दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शकील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यंकट रेड्डी याचा पाय घसरला आणि तो गाडीसोबत फरफटू लागला. ही घटना पाहायला मिळताच फलाटावरील प्रवाशांनी गोंधळ केला. ते मोठमोठ्याने ओरडू लागले. इतक्यात विकुल कुमार नावाच्या आमच्या सीआरपीएफ जवानाने त्याला पकडले आणि त्याला वाचवले. धावत्या ट्रेनमध्ये चढताना मृत्युची शिकार झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे स्वत:च काळजी घेत आपण असा प्रकार करणे टाळायला हवे, असेही रेल्वे जनसंपर्क अधिकारी शकील म्हणाले