Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

Viral Video: ट्रेन संदर्भात होणाऱ्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियात बहुतांश वेळा व्हायरल होतात. त्यात नेहमी असे दिसून येते की, जेव्हा प्लॅटफॉर्मवर ट्रेन आल्यानंतर ती पकडण्यासाठी केलेली धडपड पाहता ती अयशस्वी झाल्यास फार मोठे नुकसान होते. यामध्ये काही जणांचा जीव सुद्धा गेलाय तर काही सुदैवाने बचावले सुद्धा आहेत. अशातच सोशल मीडियात एका रेल्वे स्थानकातील असा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एक महिला प्लॅटफॉमवर पडताना दिसून आली. परंतु तेथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने देवासारखे धावत तिचा जीव वाचवला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकातील आहे. तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. व्हिडिओ पाहता असे दिसते की, बेजबाबदारपणा किती अंगलट येऊ शकतो. व्हिडिओ 1 मार्च सकाळी 4.30 मिनिटांचा आहे. एक महिला ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळी ती ट्रेन सुटते आणि महिला खाली पडते. तेव्हा समोरील पोलीस कर्मचारी धावत तिला वाचवतो.(Viral Video: कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान अचानक तुटला स्टेज; जाणून घ्या काय घडले पुढे Watch)

Tweet:

या व्हिडिओनंतर ट्विटर युजरकडून पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले जात आहे. तसेच एकाने म्हटले की, चालत्या ट्रेनमध्ये कधीच चढू नये आणि त्याची अखेरपर्यंत वाट पाहू नये.