Viral Video: कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान अचानक तुटला स्टेज; जाणून घ्या काय घडले पुढे (Watch)
कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान तुटला स्टेज (Photo Credits: Twitter)

गाण्याचा प्रकार 'कव्वाली' (Qawwali) तुम्ही नक्कीच ऐकला असेल. यामध्ये कलाकार आपल्या उत्तम आवाज आणि शैलीने लोकांची मने जिंकतात. सोशल मीडियावर तुम्हाला कव्वालीचे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. कव्वालीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कव्वालीमुळे नाही तर इतर कारणामुळे व्हायरल होत आहे. तर या कार्यक्रमावेळी स्टेजवर अनेक कलाकार बसले आहेत परंतु इतक्या लोकांच्या वजनामुळे अचानक हा स्टेज तुटतो.

मात्र या अपघातानंतरही मंचावर बसलेली एकही व्यक्ती उठत नाही. उलट सर्वजण आहे तिथेच बसून कार्यक्रम सुरु ठेवतात. स्टेजवर बसलेल्या लोकांना स्टेज तुटला तरी काही फरक पडत नाही. सहसा असा स्टेज तुटला तर, लोक घाबरतात परंतु इथे असे काहीच घडलेले दिसत नाही. स्टेज कोसळूनही जसे काही घडलेच नाही अशा अविर्भावात कार्यक्रम सुरु राहतो.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून, 'कलाकारांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये', असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3500 हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा: Viral Video: मसाले आणि डाळी ओळखण्यात 'हा' मुलगा तरबेज, सोशल मीडियात व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक झाले आश्चर्यचकित)

दरम्यान, याआधी अरवाल जिल्ह्यातील कालेर गावात एका लग्न समारंभात जयमालाच्या वेळी स्टेज तुटल्याची घटना घडली होती. स्तेगवर अचानक अनेक लोकांनी गर्दी केल्याने हा स्टेज तुटला आणि या चेंगराचेंगरीत एक महिला गंभीर जखमी झाली व त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.