Viral Video: नववधूसह वराने लग्नाच्या स्टेजवर केले Push Ups, व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Video (Photo Credits: Instagram)

Viral Video: सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने बहुतांश नागरिक घरात अडकून पडले आहेत. त्याचसोबत कोणतेही लग्नसमारंभ, कार्यक्रम आणि सण उत्सव हे अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच आता सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यानुसार एका नववधूसह वराने चक्क लग्नाच्या स्टेजवर पुशअप करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावरुन असे समजते की, हे दोघे आपल्या फिटनेसप्रती किती जागृक आहेत.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नववधू वराने आपल्या लग्नाच्या कपड्यांमध्ये स्टेजवर पुशअप करताना दिसून येत आहेत. पुशअप करताना जे वर्कआउटचे कपडे घातले नसतानाही लग्नाच्या कपड्यांमध्ये त्यांनी उत्तम पद्धतीने पुशअप केले आहे.(Mob Attack in MP at Neemuch: मध्य प्रदेशमध्ये आदिवासी युवकाला ट्रकला बांधून फरफटत नेले, पीडिताचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा फिटनेसला किती महत्व देतात हे यामधून दिसून येते. काही लोकांनी प्रतिक्रिया देत असे म्हटले की, भारी कपड्यांमध्ये व्यायाम करणे मुश्किल असते. अशा पद्धतीच्या गोष्टी करणे अनावश्यक आहेत. काही दिवसांपूर्वी असा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये एक वधूने भारी आणि घेरदार लहंगा घालून पुशअप केल्याचे दिसून आले होते.