Mahoba News:  22 सेकंदात विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने,विजेच्या झटक्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Image Credit : X

Mahoba News: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात विजेचा झटका लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात घराबाहेर लावलेल्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरूणाचा मृत्यू 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये लाइव्ह कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्रत्यक्षात मंदिरात जाण्याच्या तयारीत असलेल्या ३५ वर्षीय देवेंद्रचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांच्या आनंदाचे क्षणाचे शोकात रुपांतर झाले. त्याच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले होते की कशा,निष्काळजीपणामुळे काही सेकंदात या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

महोबाच्या चांदोन गावातील रहिवासी असलेले देवेंद्र, त्याच्या शहरातील जसोदा नगर येथील चुलत भावाच्या घरी गेला होता. तो त्यांचे चुलत भाऊ सुरेंद्र सिंह यांच्या घरी आयोजित धार्मिक कार्यक्रमात गेले होते. दरवर्षी आषाढ महिन्यात सुरेंद्र सिंह कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी मंदिरात प्रार्थना आणि नैवेद्य दाखवत असल्याचे सांगण्यात येत आहे. या परंपरेनुसार सर्वजण घरी मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच हा दुखत अपघात झाला. घरातील सर्वजण मंदिराच्या पूजेची तयारी करत असल्याचे कुटुंबीय सांगतात. कोणी प्रसाद बनवत होते तर कोणी मंदिरात अर्पण करण्यासाठी फुलांची व्यवस्ता करत होत दरम्यान, मंदिरात झेंडा घेऊन जाण्यासाठी बांबूची मोठी काठी घेऊन देवेंद्र घराच्या मुख्य गेटमध्ये प्रवेश करताच घराच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या ३३ केव्ही वीजवाहिनीला काठीचा स्पर्श झाला आणि त्याला विजेचा धक्का बसला. हेही वाचा:  Karad Video: विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी

 

 

कोणाला काही समजण्याआधीच खांबावरुन आलेल्या विद्युत प्रवाहात देवेंद्र अडकला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पावसामुळे बांबूच्या काड्यांमध्ये ओलावा त्यामुळे वीजवाहिनीवरून विद्युतप्रवाह घसरला होता. विजेचा जोरदार झटका बसल्याने देवेंद्रचे डोके लोखंडी गेटवर आदळले आणि तो जमिनीवर कोसळला. जवळच उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी त्याचे हात, पाय आणि छाती चोळण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.