electric shock Karad PC TW

Karad Video: महाराष्ट्रातील सातार येथील कराड येथे शुक्रवारी दुपारी वीज ट्रान्सफॉर्मरला जोडलेल्या तारांचा विजेचा धक्का लागल्याने दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन शेतकरी जखमी झाले आहे. दुपारी अडीच्या सुमारास शेतकरी बैलगाडीतून सोयाबीन पेरणीसाठी जात असताना अचानक बैलांना विजेचा धक्का बसला. या घटनेनंतर जनावरे दोघे ही खाली कोसळले. बैलगाडीत बसलेले शेतकरी जखमी झाले.  (हेही वाचा- मुंबईत दमदार पाऊस, विरार येथे झाड कोसळून 70 वर्षीय महिला ठार; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह)

मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील विजेचा धक्का लागून दोन बैलाचा जीव गमावला. ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतला. त्यांनी तातडीने पोलिस आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या दोघांनाही सूचना दिल्या आहे. काही वेळातच महावितरणेच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दुख व्यक्त केले आहे.

काही वेळातच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बैलांचे नुकसान आणि जखमी झाल्याने झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. जखमी शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.