Urine Business: काय सांगता? चक्क आपली 'लघवी' विकून हजारो रुपये कमावत आहे ही मॉडेल; त्यापासून चाहते बनवत आहेत आईसक्रीम
Urine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पैसे कमावण्यासाठी लोक असे अनेक मार्ग शोधत असतात, ज्यामध्ये मेहनत कमी कमाई जास्त होईल. यासाठी काहीजण ऑनलाइन ट्रेडिंग करतात, तर काही सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतात. आतापर्यंत कोणी आपले मूत्र (Urine) विकून पैसे कमावल्याचे ऐकले नसेल. परंतु आता ते घडत आहे. एक मॉडेल चक्क आपली लघवी विकून पैसे कमावत आहे. कॅक्टस कुटी (Kactus Kutie) असे या मॉडेलचे नाव असून, ती ऑनलाइन आपले मूत्र विकत आहे.

कॅक्टसची, एक मेडिकल कप म्हणजेच 3 औंस लघवी हजारो रुपयांना विकली जात आहे. तुम्हाला कदाचित हे किळसवाणे वाटत असेल, परंतु ते विकत घेणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कॅक्टस कुटी ‘ओन्ली फॅन्स’ नावाच्या साइटवर एक मॉडेल आहे आणि तिने 2016 पासून आपले मूत्र विकण्याचा हा विचित्र व्यवसाय सुरू केला. ती तिच्या चाहत्‍यांसाठी केवळ लघवीच विकत नाही तर, तिने 10 मिनिटे लघवी करण्‍याचा व्हिडिओदेखील बनवला आहे.

प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम करणारी कॅक्टस सांगते की तिचे असे अनेक व्हिडिओ चाहत्यांना आवडले आहेत आणि असे व्हिडिओ बनवण्यासाठी तिला खास सरावदेखील करावा लागतो. तिच्या अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटते की, ती 10 मिनिटे लघवी कशी करू शकते? परंतु यासाठी ती विशेष काळजी घेते व महिन्यातून 1-2 वेळा याचा सराव करते. (हेही वाचा: OnlyFans Porn: जॉब सोडून जोडप्याने 'ओन्ली फॅन्स’वर Sex Video बनवायला केली सुरुवात; महिन्याची कमाई ऐकून बसेल धक्का)

कॅक्टस कुटीची लघवी होल्ड करण्याची क्षमता पाहून तिचे चाहते इतके प्रभावित झाले आहेत की, ते तिचे मूत्र विकत घेण्यासही तयार आहेत. तिच्या लघवीने भरलेल्या 3-औंस मेडिकल कपची किंमत £52, म्हणजेच सुमारे 5,200 रुपये आहे. जे ग्राहक जास्त लघवी घेतात त्यांना ती त्यावर सूटही देतात. कॅक्टसने संगितले होते की, चक्क आईसक्रीम बनवण्याठी एका चाहत्याने तिची लघवी विकतघेतली होती.