Thugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल !
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमा (Photo Credits : Twitter)

बहुचर्चित सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' प्रदर्शित झाला आणि सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवलेले प्रेक्षक नाराज झाले. या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बीग बी अमिताभ बच्चन ही जोडी एकत्र झळकली. सिनेमाच्या ट्रेलरने तर सिनेमाविषयची उत्सुकता अधिकच वाढवली. त्याचबरोबर या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळत आहे. व्हिएएक्स, तगडे बजेड यामुळे एकूणच सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र प्रदर्शना दिवशीच सिनेमाने प्रेक्षकांची खूप निराशा केली. त्यामुळे या सिनेमाची खिल्ली उडवणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तुम्हीही पाहा हे मिम्स...

या सर्व गोष्टींमुळे हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.