साप (Snake) म्हटले की भल्याभल्यांना घाम फुटतो. एका व्हिडिओत (Snake Video) मात्र असाच एक भलताच लांबडा साप चक्क एका व्यक्तीच्या हातून पाणी पिताना दिसतो आहे. होय, अनेकांसाठी अविश्वसनीय असा असलेला हा व्हिडिओ. पण व्हिडिओ (Viral Video) पाहिल्यावर मात्र ध्यानात येते की खरोखरच साप एका व्यक्तीच्या हातून पाणी पितो आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Thirsty Snake Drinks Water Viral Video) पाहून आपण काही तर्क बांधू शकता. त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पाहावा लागेल. पण, तुम्ही जर सापाला घाबरत असाल तर हा व्हिडिओ स्वत:च्या जबाबदारीवरच पाहा बरं.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ @snakes.empire नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल आहे.आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाखांहूनही अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला असून, लाखो युजर्सनी लाईक केला आहे. अनेकांनी शेअर आणि काहींनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. एका युजरने म्हटले आहे की, सापाला पाणी पाजणारा व्यक्ती मूर्ख आहे. साप कधीतच माणसाचा मित्र होऊ शकत नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, पाणी पिताना हा विशारी साप खूपच सुंदर दिसतो आहे. (हेही वाचा, Poisonous Snakes in India: भारतातील विषारी फुरसे साप Shipping Container च्या माध्यमातून इंग्लंडला पोहोचला)
व्हिडिओ
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या ओंजळीने सापाला पाणी पाजत आहे. सापही अगती पाळीव प्राण्याप्रमाणे या व्यक्तीच्या हातून शांतपणे पाणी पिताना दिसत आहे. आपण कल्पनेतही एखादे चित्र पाहू शकत नाही असे दृश्य आपणास पाहायला मिळते.