Viral Video: ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने तरुणाने केलं जुगाड; पण पुढे काय झालं? पहा व्हिडिओ
Viral Video (Photo Credit - X/@ChapraZila)

Viral Video: जगात जेव्हा जेव्हा जुगाडची चर्चा होते तेव्हा भारताचे नाव अग्रस्थानी येते. इथे प्रत्येक गल्लीत तुम्हाला असे लोक सापडतील जे आपल्या युक्तीने महान अभियंते आणि शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करू शकतात. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. या उदाहरणांवरून प्रेरित होऊन एका माणसाने ट्रेनमध्ये स्वत:साठी सीटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पण त्याचं जुगाड यशस्वी होऊ शकलं नाही.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती सीटच्या दरम्यान बांधलेल्या चादरीवर झोपलेला दिसत होता. या तरुणाचा जुगाड लोकांना खूप आवडला. आता याच व्यक्तीच्या जुगाडाने प्रेरित होऊन या तरुणानेही ट्रेनमध्ये स्वतःसाठी सीटची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असावा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती सीटच्या मध्ये एक चादर बांधतो आणि नंतर त्यावर बसायला जातो. पंरुत, अवघ्या 2-3 सेकंदांत तो खाली पडतो. या तरुणाचं हे जुगाड पाहुन नेटीझन्स लोटपोट होत आहेत. विशेष म्हणजे हे जुगाड अयशस्वी झाल्याने तो खाली कोसळला. त्यामुळे लोकांना हे दृश्य पाहून हासू आवारण अशक्य आहे. (हेही वाचा - PM Modi Statue Kissed: काश्मिरी व्यक्तीने घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे चुंबन; पहा व्हायरल व्हिडिओ)

व्हायरल व्हिडिओ पहा -

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) वर @ChapraZila नावाच्या पेजने शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'कोणतेही तिकीट सापडले नाही, सीट सापडले नाही. काही युक्त्या केल्या पण त्याही अयशस्वी. बिहारच्या बाहेर जाणे ही मजबुरी आहे.' वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडिओ सुमारे 60 हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे की, 'देशातील लोकसंख्या जास्त आहे. त्यानुसार, ट्रेन आणि जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात आली नाही. दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ही समस्या फक्त बिहारमध्येच नाही, सर्वत्र अशी परिस्थिती आहे.