PM Modi Statue Kissed: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुतळ्याला किस करतानाचा (PM Modi Statue Kissed) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक काश्मिरी व्यक्ती पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याला चुंबन घेताना दिसत आहे. तो स्वत:च्या हाताने पुतळा साफ करतानाही दिसत आहे. Pheran Day च्या निमित्ताने या काश्मिरी व्यक्तीने श्रीनगरमधील क्लॉक टॉवरसमोरील पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे चुंबन घेतले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. पीएम मोदींच्या पुतळ्याला किस करतानाचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेख इम्रान नावाच्या पत्रकाराने त्याच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना शेख इम्रानने पीएम मोदी, पीएमओ, भाजप, अमित शहा इत्यादींना टॅग केले. (हेही वाचा - PM Modi Expressed Pain: संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची नक्कल करणे हे घृणास्पद, पंतप्रधानांनी फोन करुन व्यक्त केली खंत)
पहा व्हिडिओ -
Kashmiri Man Kisses A Statue of PM Modi infront of Ghantaghar | Pheran day .@narendramodi @BJP4India @BJP4JnK @RavinderRaina @AmitShah @PMOIndia @HMOIndia @TheSkandar @manojsinha_ @DrSJaishankar @ianuragthakur @Swamy39 @BJP4Gujarat @BJP4Delhi pic.twitter.com/hevT7F3Sx1
— Sheikh_imran_official (@Sheikhimran_) December 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)