Woman Free Birthing her Son in the Ocean: आतापर्यंत तुम्ही गरोदर महिलांनी रेल्वे स्टेशन, बस, स्ट्रेन, विमानात बाळाला जन्म दिल्याचं ऐकलं असेल. तुम्हाला जर सांगितलं की, एका महिलेने समुद्रात आपल्या बाळाला जन्म दिला. हे ऐकून तुम्हाला कदाचित खर वाटणार नाही. परंतु, हे खर आहे. सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ही महिला समुद्राच्या लाटांमध्ये बाळाला जन्म देताना दिसत आहे. आपल्या मुलाला समुद्रात जन्म देणाऱ्या या आईने म्हटले आहे की, तिचा अनुभव 'Free Birth' होता. जोसी प्यूकर्ट (Josy Peukert) असं या 37 वर्षीय महिलेचे नाव आहे. जोसीने आपल्या Instagram अकाऊंटवर प्रसृतीदरम्यानचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये महिला आपला जोडीदारा निकारागुआ (Nicaragua) सोबत पाय माजगुअल (Paya Majagual) च्या किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्यात बाळाला जन्म देताना दिसत आहे.
जोसीने शेअर केलेला हा व्हिडिओ 200,000 पेक्षा जास्त वेळा पाहिल्या गेला आहे. यात जोसीला प्रसृतीदरम्यान वेदना होत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर थोड्याचं वेळात ती आपल्या बाळाला जन्म देते आणि पोटाशी धरते. समुद्राच्या लाटांमध्ये बाळाला जन्म देण्याचा अनुभव खरोखर आनंददायी असल्याचं जोसीने म्हटलं आहे. (हेही वाचा - Viral Video: नदीत दगडावर आरामात बसलेला असताना अचानक महाकाय साप पाहून तरूणाची उडाली भंबेरी, पाहा काय केले तरुणाने)
आपल्या प्रसृतीसंदर्भात बोलताना जोसी म्हणाली, 'लाटांची आकुंचन आणि माझ्या वेदना सारख्याचं होत्या. त्या सुरळीत प्रवाहामुळे मला खूप छान वाटले. माझ्या डोक्यात ही कल्पना आली की, मला माझ्या बाळाला समुद्रात जन्म द्यायचा आहे.'
दरम्यान, जोसीला प्रसूती कळा यायला लागल्यावर तिने मुलांना मित्रांकडे पाठवले आणि ती तिचा जोडीदार बेनी कॉर्नेलियस सह बर्थिंग टूल किट घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचली. यावेळी त्यांनी आपल्या सोबत केवळ एक टॉवेल, प्लेसेंटा कापण्यासाठी साहित्य घेतलं होतं. त्यानंतर जोसी आणि बेन्नी यांनी त्यांचा मुलगा बोधी अमोर (Bodhi Amor) याचे 27 फेब्रुवारीला महासागर कॉर्नेलियस मध्ये स्वागत केले. जोसी म्हणते तिचा बाळंतपणाचा अनुभव "चिंतामुक्त" होता. कोणत्याही डॉक्टर किंवा दाईंचा सहभाग नसताना तिला पूर्वीपेक्षा कमी त्रास झाला.
त्यानंतर जोसीने सांगितले की, "बोधीचा जन्म झाल्यावर आम्ही त्याला टॉवेलमध्ये गुंडाळले. मी फ्रेश होण्यासाठी समुद्रात परत गेले. कपडे घातले आणि आम्ही सर्व काही पॅक केले. त्यानंतर आम्ही घरी निघालो. मला एकदा चिंतामुक्त व्हायचे होते. याआधी माझी पहिली प्रसृती दवाखान्यात झाली. जी अत्यंत क्लेशकारक होती. माझ्या दुसरा बाळाचा जन्म घरीचं झाला. परंतु तिसऱ्यावेळी माझ्याघरात दाई नव्हती.
विशेष म्हणजे यावेळी जोसीने कोणत्याही डॉक्टरांची भेट किंवा स्कॅन केले नव्हते. तिला बाळाच्या आगमनाची अंतिम तारीख माहित नव्हती. परंतु, तिला केवळ विश्वास होता की, तिचं बाळ आपला मार्ग बनवेल. यासंदर्भात बोलताना जोसी म्हणते की, “मला आमच्या आयुष्यात नवीन लहान आत्म्याचे स्वागत करण्याची भीती किंवा काळजी नव्हती. फक्त मी, माझा जोडीदार आणि लाटा. हे खूप सुंदर होते. माझ्या खाली असलेल्या मऊ ज्वालामुखीच्या वाळूने मला आठवण करून दिली की, स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये फक्त जीवन आहे."
जोसीने बोधीच्या जन्मानंतर दोन दिवसांनी तिच्या Instagram खात्यावर @raggapunzel वर व्हिडिओ ऑनलाइन शेअर केला. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेन्ट्स केल्या. यातील अनेकांना जोसीची प्रसृती "स्वच्छतापूर्ण" होती की नाही, याबद्दल चिंता व्यक्त केली. यातील एका यूजर्सने विचारले, "हे स्वच्छताविषयक आहे का? समुद्रात बरेच जीवाणू असतात." तसेच दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, "त्या नवजात बाळाला किती धक्का बसला असेल, एका उबदार गर्भापासून ते थंड समुद्रापर्यंत."
परंतु, जोसीने तिच्या कृतीचा बचाव करण्यासाठी नकारात्मकतेला त्वरीत प्रतिसाद दिला. तिने यूजर्संना सांगितले की, तिचा मुलगा "पूर्णपणे निरोगी" आहे आणि सागरी जन्म सुरक्षित आहे. बोधीचा जन्म दुपारच्या उन्हात झाला जेव्हा तापमान 35 अंश सेल्सिअस होते. आम्हाला अजिबात काळजी नव्हती की, त्याला सर्दी होईल किंवा मला जलजन्य संसर्गाची कोणतीही चिंता नव्हती. तो पूर्णपणे निरोगी आहे, असंही जोरीने म्हटलं आहे.