ठाणे: रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ कर्मचाऱ्याने वाचवले प्राण (Watch Video)
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईच्या लोकलने दररोज लाखो हजारो नागरिक प्रवास करत असतात. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर लोकल दर 5 ते 10 मिनिटांनी प्रवाशांच्या सेवेसाठी हजर होतात. मात्र घडाळ्याच्या काट्यानुसार धावणारे मुंबईकर लोकल पकडण्यासाठी सैरवैर पळताना दिसतात. मात्र या धावपळीत व्यक्तीचा जीव गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना ठाणे रेल्वेस्थानकात घडली आहे. अनिल कुमार नावाच्या एक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जात होता. मात्र समोरुन लोकल आल्याने त्याला वाचवण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्याने धाव घेत त्याचे प्राण वाचवले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच अनिल कुमार नावाचा प्रवाशाकडून रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रकार समोर आला. मात्र आरपीएफ कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरपीएफच्या कर्मचाऱ्याच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. तसेच पादचारी पूल, सरकते जिने यांचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(खबरदार! पुणे विभागात रेल्वेचा अपघात करण्याचे प्रयत्न; घातपाताचा कट शिजत असल्याचा संशय)

Central Railway Tweet:

तसेच काही महिन्यांपूर्वी सीएसएमटीसाठी डोंबिवली येथून निघालेल्या फास्ट लोकलमधून पडून सविता नाईक या तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पुणे येथून मुलाच्या विवाहाच्या पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या वरबापाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.