सध्या कोरोना व्हायरसने देशभर आपली दहशत पसरवली आहे. भारतामध्ये मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत गेलेल्या कोविड 19 च्या फैलावावर अद्याप कोणतेच औषध नसल्याने लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळत, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करत पुन्हा जनजीवन सुरळीत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता तमिळनाडूच्या मदुराईमध्ये एका रेस्टारंट चालकाने ग्राहकांमध्ये मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती पसरवण्यासाठी चक्क मास्कच्या आकारातच पराठे बनवण्याची शक्कल वापरण्यात आली आहे. कोविड 19 च्या संकटात अजूनही लोकं मास्क परिधान करण्याबाबत सजग नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरू केल्याचं ANI या वृत्त संस्थेशी बोलताना रेस्टॉरंट मॅनेजर Poovalingam यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सोशल मीडियामध्ये कोरोना व्हायरस सदृश्य आकृतीमधील डोसा देखील व्हायरल झाला आहे. COVID 19: 'आपण Corona ला पचवू शकतो,तो आपल्याला नाही' असे म्हणत पश्चिम बंगाल मध्ये साकारण्यात आली कोरोना च्या रूपातील मिठाई (See Photos)
#WATCH Tamil Nadu: A restaurant in Madurai is serving parottas made in the shape of masks. Manager Poovalingam says, "People of Madurai are not very particular about wearing masks. We introduced mask parottas to spread awareness among people about #COVID19." pic.twitter.com/pmdCRNBtCo
— ANI (@ANI) July 9, 2020
कोरोना डोसा
Amidst soaring #COVID19 cases in #Madurai, a restaurant chain introduces 'face mask' parotta, 'corona' rava dosa & 'corona' bonda.
Aimed at creating awareness & attracting diners in #Madurai #TamilNadu pic.twitter.com/2E86sSs9Sm
— Chennai 360 (@Chennai360News) July 8, 2020
दरम्यान अशाप्रकारे बनवलेले खाण्याची इच्छा किती लोकांना होईल? याबाबत खात्री नाही. पण समाजात या गोष्टीमुळे नागरिकांना लॉकडाऊनमधून मिळालेली मुभा ही विनाकरण फिरण्यासाठी नाही. याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्यासाठी आहे. दरम्यान तमिळनाडूमध्ये लॉकडाऊनमधून मुभा दिल्यानंतर कोरोनाबाधितांच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळाले आहे.