Latiesha Jones (Photo Credit : Instagram)

जगभरात विविध मार्गांनी, चित्र-विचित्र गोष्टी करून लोक पैसे कमावत आहेत. असे लोक कोट्याधीश देखील होत आहेत. आताही असेच एक प्रकरण समोर आले आहे. युनायटेड किंगडममध्ये एक महिला आहे जी चक्क तिची थुंकी (Spit) विकून खूप पैसे कमावत आहे. हा व्यवसाय करण्यासाठी तिने तिचा डॉक्टरकीचा अभ्यास सोडून दिला आहे. अहवालानुसार, ती तिची थुंकी विकून आठवड्याला हजारो डॉलर कमवत आहे.

लतीशा जॉन्स (Latiesha Jones) असे या मुलीचे नाव असून, तिने TikTok वर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने या तिच्या व्यवसायाबाबत माहिती दिली आहे. गेल्या 4 वर्षांपासून ती हे काम करत आहे. लतीशाने सांगितले की तिने फक्त गंमत म्हणून हे काम सुरू केले होते, परंतु जेव्हा कमाई सुरू झाली तेव्हा तिने ते पुढे चालू ठेवले.

सध्या लतीशाचे वय अवघे 22 वर्षे आहे. थुंकी विकून तिने आपले 9.11 लाख रुपयांचे कर्ज फेडले आहे. ती आधी टेस्कोमध्ये काम करायची, पण आता तिथल्या पैशांची गरज नसल्याने तिने ते काम सोडले. मँचेस्टरच्या या मुलीला डॉक्टर व्हायचे होते आणि म्हणूनच ती बायोमेडिकल सायन्सचा अभ्यास करत होती. मात्र तिच्या नशिबात दुसरेच काही लिहिले होते.

लतीशाने या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याबाबतही माहिती दिली आहे. सुरुवातीला तिने पैसे कमावण्यासाठी 'OnlyFans' चा आधार घेतला होता. या ठिकाणी खाते तयार करून तिने कमाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे व्हिडीओ पाहून लोकांनी तिच्याकडे तिच्या वैयक्तिक गोष्टी मागण्यास सुरुवात केली. तिचे आंघोळीचे पाणी, वापरलेला टॉवेल, वापरलेली अंतर्वस्त्रे अशा अनेक गोष्टी चाहते मागू लागले. त्याचवेळी एकाने तिची थुंकी मागितली. या व्यक्तीला लतीशाने तिच्या थुंकीची बाटली $372 म्हणजेच साधारण 30,812 रुपयांना विकली. (हेही वाचा: तरुण राहण्यासाठी सीईओ Bryan Johnson ने घेतले मुलाचे रक्त; वर्षाला स्वतःवर खर्च करत आहे 16 कोटी रुपये, जाणून घ्या कशी आहे लाइफस्टाइल)

यानंतर अनेक लोक तिची थुंकी मागू लागले व आता तिचा हा व्यवसाय बनला आहे. तिने सांगितले की, आता ती तिची थुंकी किमान $248 प्रति बाटली या दराने विकते. महत्वाचे म्हणजे तिची वापरलेली बेडशीट, तिचे घामाचे जिम टॉवेल्स, टूथब्रश विकून ती एका आठवड्यात $6223 (5.15 लाख रुपये) कमवते. तिने सांगितले की तिचा प्रियकर आणि जुळी बहीण तिला पाठिंबा देतात. या पैशांमध्ये लतीशाने मालमत्ताही खरेदी केली आहे.