Mumbai Transgender Auto Drivers Manju | (Photo Credit: Facebook)

तृतीयपंथीय (Transgender) हा आपल्या समाज व्यवस्थेत तसा जाणिवपूर्वक दूर्लक्षीत ठेवलेला घटक. समाजातील रुढी, परंपरा, जातियता आणि अनिष्ठ प्रकारांना आळा घालून त्यांचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत गेले. त्याला यश किती आलं हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा. पण, असे असताना तृतीयपंथीय हे समाजव्यवस्थेचा अभ्यास करणारे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या मंडळींच्या केंद्रस्थानी फारसे कधी आलेच नाहीत. असे असले आता जमाना बदलला. तृतीयपंथीयांना स्वत:चा आवाज प्राप्त झाला. अशा आवाजांपैकीच एक म्हणजे रिक्षावाली मंजू (Transgender Auto Drivers Manju). मुंबईची रिक्षावाली म्हणून सध्या ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल (Viral) झाली आहे.

तृतियपंथी समाजाचा घटक असलेली मंजू मुंबईत रिक्षा चालवते. समाजाच्या डोळ्यात डोळे घालून ताट मानेने जगते. तृतियपंथी म्हणून समाजाकडून नाकारले जाणे तिला मान्य नाही. तिच्या या हटके जीवनशैलिमूळेच ती लोकांचेही लक्ष वेधून घेते. पूनम खींची नावाच्या एका तरुणीने तिच्या फेसबुकवर अकाऊंटवर मंजूबद्दल माहिती आणि फोटो शेअर केले आहेत. ही माहिती आणि फोटो फेसबुकवर येताच मंजू सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, Kinnar Gangwar in Nagpur: चमचम विरुद्ध उत्तमबाबा यांच्यात नेतृत्वावरुन संघर्ष; नागपूर येथे तृतियपंथियांच्या दोन गटात जोरदार राडा; एकाची प्रकृती चिंताजनक)

पूनम खींची फेसबुक पोस्ट

पूनम खींची या तरुणीने लिहिलेल्या फेसबुक पोस्टनूसार, गेले पाच वर्षे मंजू रिक्षाचालक म्हणून काम करते. सकाळी सुर्योदयानंतर सुरु झालेल्या तिचा दिवस रात्री 11 वाजता संपतो. रात्री 11 नंतर ती रिक्षा चालवत नाही. काही लोक करण नसताना जाणूनबूजून त्रास देतात. त्यामुळे या लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण रात्री 11 नंतर रिक्षा चालवत नसल्याचे मंजू सांगते. 'तृतीयपंथीय असले म्हणून काय झाले? मी कमावते कष्टाची भाकरी!', असंही मंजू सांगते.