Kinnar Gangwar in Nagpur: नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन नागपूर (Nagpur) येथे तृतियपंथियांच्या दोन गटात मंगळवारी जोरदार राडा झाला. नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन चमचम (Kinnar Cham cham) आणि उत्तमबाबा (Transgender Uttam Baba) हे दोन गट एकमेकांना भिडले. प्राप्त माहितीनुसार, उत्तमबाबा हा सेनापती म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यात आणि चमचम यांच्यात नेतृत्वावरुन वाद सुरु होता. या वादाचे पर्यावसन जीवघेण्या हल्ल्यात झाले. यात चमचम गंभीर जखमी झाली. उपचारासाठी चमचम यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्या येत आहे. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली.
सांगितले जाते की, विदर्भ आणि प्रामुख्याने विदर्भातील तृतियपंथियांची गादी सांभाळतो. त्याच्या नेतृत्वाला चमचम नावाच्या आणखी एका तृतियपंथियाने आपला गट निर्माण करुन आव्हान दिले. या आव्हान प्रतिआव्हानामुळे या दोन गटात बऱ्याच काळापासून वैमनस्य आहे. या वैमनस्यातून एकमेकांना धमक्या देणे, छोटी-मोठी हातापाई होणे असे प्रकार या दोन गटांत नेहमीच सुरु आसतात. कधी कधी हे दोन्ही गट अगदिच टोकाला जातात. दोन वर्षांपूर्वी उत्तमबाबा गटाने विरोधी गटातील काही तृतियपंथियांवर बंदुकीतून गोळीबारही केला होता. या रागाच्या बदल्यातून चमचम गटाने उत्तमबाबा याला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पाचपावली, लकडगंज, वर्धमाननगर, जरीपटका, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही गटांच्या एकमेकांविरोधात तक्रारी नोंद आहेत.
मागिल आठवड्यात या दोन्ही गटातील वैमनस्य अधिकच वाढले. यातून मंगळवारी दुपारच्या वेळी उत्तमबाबा हा आपल्या साथिदारांसह चमचम याच्या कामनानगर येथील घरी पोहोचला. येथे उत्तमबाबा आणि चमचम यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या वेळी उत्तमबाबा गटाकडून चमचम याच्यावर चाकूने हल्ला चढवण्यात आला. यात चमचम गंभीर जखमी झाला. (हेही वाचा, तृतीयपंथी चिडवल्याने तरुणाची आत्महत्या)
दरम्यान, घडल्या प्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, शहरातील इतर भागांतील तृतियपंथियही मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. एकूण वातावरणाची गांभीर्याने नोंद घेत पोलिसांनी उत्तम बाबा याला ताब्यात घेतले.