चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका मुलावर नेटकऱ्यांनी मुलींचे कपडे घालून व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केल्याने त्याला लोकांनी तृतीयपंथी म्हणून प्रतिक्रिया दिल्या होत्या. याच नैराश्यातून या 24 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर या तरुणाने ट्रेनखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे.
वी. कलायारासन असं या तरुणाचे नाव आहे. तर सोशल मिडियावरील टिकटॉप या अॅपद्वारे स्वत: चे व्हिडिओ पोस्ट करायची आवड लागली होती. तसेच प्रत्येक वेळी कलायारासन हा नव- नविन पद्धतींचे व्हिडिओ या अॅपद्वारे तेथे पोस्ट करायचा. त्यातील एका व्हिडिओत त्याने महिलेचे कपडे घातलेला व्हिडिओ पोस्ट करताच त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. एवढच नसून त्याला महिलेचे कपडे घातले आहेत म्हणून हिणवू लागले होते. तर काहींनी त्याला नपुसंक म्हणून ही चिडवले आहे. या सर्व नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेमुळे त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
मात्र कलायारासने पोस्ट केलेल्या व्हिडिओत मी कोणाला घाबरत नाही, मला जे वाटते ते मी करतो असे ही पोस्टच्या खाली लिहिले होते.या घटनेतील मृत पावलेल्या कलायारासनचा मोबाईल हरविल्यामुळे पोलिसांना तपास करण्यास अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.