Siddharth Jadhav On Indigo Airlines: सिद्धार्थ जाधव याचे विमान प्रवासादरम्यान नुकसान, इंडिगो एअरलाईन्स कंपनीबद्दल संताप (Watch Video)
Siddharth Jadhav | (Photo Credits: X)

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांनी इंडिगो एअरलाईन्स कंपनीबद्दल (Indigo Airlines) आपली नाराजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली आहे. अभिनेत्याने या कंपनीच्या विमानाने प्रवास करताना आलेल्या अनुभवाबद्दल लिहीले आहे. त्यानंतर कंपनीने तातडीने प्रतिसाद देत झालेल्या त्रास आणि नुकसानीबद्दल वाईट वाटल्याचे म्हटले आहे. शिवाय, आपल्याला सहकार्य करण्यासाठी आपण आपला संपर्क क्रमांक डीएम करावा, असे अवाहनही केले आहे. नेमके काय घडले आहे सिद्धार्थसोबत? पाहा व्हिडिओ (Siddharth Jadhav Viral Video), घ्या जाणून.

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट

सिद्धार्थ जाधव यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, ते इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. या वेळी त्यांनी आपली बॅग विमान प्रशासनाकडे नेहमीप्रमाणे जमा केली. पण, प्रवास संपल्यावर ते जेव्हा आपली बॅग घेण्यासाठी पोहोचले तेव्हा मात्र त्यांची बॅग तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. यावरुन जाधव यांनी संताप व्यक्त करत आपली भावना सोशल मीडियावर व्यक्त केली आणि ती विमान कंपनीच्या व्यवस्थापनापर्यंतही पोहोचवली. (हेही वाचा, Siddharth Jadhav On Raj Thackeray: राज ठाकरे आणि खालापूर टोल नाक्यावरील प्रसंग, सिद्धार्थ जाधव याने सांगितला अनुभव (Watch Video))

नेमकं प्रकरण काय?

सिद्धार्थ जाधव यांनी सोशल मीडियावर आपल्या तुटक्या बॅगसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, "नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता मुंबईवरुन गोव्याला इंडिगो फ्लाईटनं आलो आहे. त्यांनी किती छान पद्धतीनं माझं माझी बॅग मला दिली आहे. त्यांनी माझं जे लगेच आहे ते हँडल विथ केअर केलेले आहे. म्हणजे माझ्या बॅगचे केवळ हँडलच ठेवले आहे. छानच आहेत इंडिगोवाले... तुम्ही माझ्या बॅगची खूपच चांगली काळजी घेतली. ही बॅग पाहून माझ्याकडे शब्दच नाहीत.. इंडिगोवाल्यांनी माझ्या सामानाची काळजी खूपच छान घेतली आहे, बघा तुम्हीच." दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करताना सिद्धार्थने "थँक्स इंडिगो" असे या व्हिडिओला शीर्षक दिले आहे. (हेही वाचा, Mumbai-Chennai IndiGo Flight Delay: को-पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याने चेन्नईहून मुंबईकडे जाणार्‍या इंडिगो फ्लाइटला 4 तासांचा विलंब; प्रवाशांमध्ये संताप)

कंपनीकडून प्रतिसाद

अभिनेत्याचा व्हिडिओ मिळताच इंडिगो कंपनीने तत्काळ प्रतिसाद दिला. तसेच, तुमच्या बॅगची अवस्था आणि झालेले नुकसान पाहून आम्हाला वाईट वाटले. आम्ही आपल्याला सहकार्य करु इच्छितो. त्यासाठी कृपया आपण आपले नाव आणि संपर्क डएम करु शकता का? अशी विचारणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

व्हिडिओ

एक्स पोस्ट

दरम्यान, सिद्धार्थने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच नेटीझन्सनीही त्याला प्रतिदासाद दिला आहे. काहींनी विमान कंपनी व्यवस्थापनाचा हा निष्काळजीपणा आहे. तुम्ही त्याबाबत तक्रार करा, असा सल्लाही त्याला दिला आहे. सिद्धार्थ जाधव हा अभिनेता आहे. त्याने मराठी, हिंदी आणि इतरही काही भाषांमध्ये अभिनय केला आहे. सिद्धार्थ जाधव याचा लग्न कल्लोळ हा सिनेमा नुकताच प्रदर्शीत झाला होता. 'दे धक्का', 'लालबाग परळ', 'धुराळा', 'हुप्पा हुय्या' यांसारखे अनेख चित्रपट गाजले आहेत.