रानू मंडल यांनी गायलं शाहरुख खान चं गाणं; पहा हा Viral Video
Ranu Mandal (Photo Credits: Facebook)

एका वायरल व्हिडिओमुळे रेल्वे प्लॅटफॉर्म ते थेट हिमेश रेशमिया यांच्या चित्रपट गाण्याची संधी असा रानू मंडल यांचा एकंदर प्रवास आहे. त्यांचा रेल्वे स्टेशनवर गाण्याचा विडिओ तर वायरल झालाच पण त्यानंतर त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्याच्या व्हिडीओंना लोकांकडून तितकाच उत्तम प्रतिसाद मिळाला.

अलीकडे रानू यांचं अजून एक गाणं प्रचंड वायरल झालं आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या शाहरुख खानच्या चित्रपटही गाणी कोणाला आवडत नाहीत. त्याच चित्रपतील'तुझे देखा तो ये जाना सनम' हे गाणं गातानाचा रानू यांचा एक विडिओ सध्या प्रचंड गाजत आहे. काही मिनिटातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र वायरल झाला.

पहा तो व्हिडिओ

'कॉमेडी स्टार्स' या रिएलिटी शोमध्ये रानू यांना गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी रानूनं हे गाणं गायलं. त्यांच्या फॅन क्लबने त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

 Watch Video: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा 'हा' व्हिडिओ वायरल

विशेष म्हणजे, लवकरच रानू मंडल यांच्यावर आयुष्यावर एक बायोपिक प्रदर्शित होणार असून 'प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल' असं त्या चित्रपटाचं नाव असेल. ऋषिकेश मंडल हे या बायोपिकचं दिग्दर्शन करत असून रानू यांचा पश्चिम बंगालच्या प्लॅटफॉर्मपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.