लोकप्रिय ओडिया गायक (Odia singer) मुरली महापात्रा (Murali Mohapatra) यांचा दुर्गापूजा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करत असताना मृत्यू झाला.मुरली महापात्रा मंचावरुन गाणे गात होते. दरम्यान, गाणे गात असतानाच स्टेजवर अचानक कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. ही घटना ओडिशाच्या (Odisha) कोरापुट (Koraput district) जिल्ह्यात घडली. महापात्रा यांना गाणे गाताना मंचावरच मृत्यू आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
ओडिया गायक (Odia singer) मुरली महापात्रा यांच्या गाण्याचा कार्यक्रम जेयोर शहरात सुरु होता. दुर्गापुजेनिमित्त सुरु असलेल्या या कार्यक्रमात चार गाणी गायल्यानंतर महापात्रा स्टेजवरच खुर्चीवर बसले. त्यांना अस्वस्थ वाटत होते. दरम्यान, ते जागीच कोसळले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुरली महापात्रा यांचे बंधू बिभूती प्रसाद महापात्रा यांनी माहिती देताना सांगितले की, रविवारी रात्री उशिरा त्यांचे बंधून मुरली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोहपात्रा हे जेपोर उपजिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे सरकारी कर्मचारी होते. नऊ महिन्यांनंतर ते सेवेतून निवृत्त होणार होते, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Naked Protest: फ्रेंच अभिनेत्री Corinne Masiero हिने अचानक स्टेजवर उतरवले कपडे, Nude होत सरकारसाठी पाठीवर लिहिला 'हा' संदेश)
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी महापात्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पटनायक यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, लोकप्रिय गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाबद्दल कळले. त्यांच्या जाण्याने दु:ख झाले. त्यांचा मधुर आवाज श्रोत्यांच्या हृदयाला नेहमीच राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना.
मुरली महापात्रा यांचे मित्र प्रशांत कुमार मिश्रा यांनी सांगितले की महापात्रा यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांना सांगितले की ते आजारी आहेत आणि काही चूक असल्यास सर्वांनी सहकार्य करावे, अशी त्यांनी विनंती केली होती.