Naked Protest: फ्रेंच अभिनेत्री Corinne Masiero हिने अचानक स्टेजवर उतरवले कपडे, Nude होत सरकारसाठी पाठीवर लिहिला 'हा' संदेश
Corinne Masiero (Photo Credits: Youtube

French Actress Corinne Masiero Naked Protest for Culture: फ्रेंच ऑस्कर अवॉर्ड्स सेरेमनी च्या मंचावर अशा वेळी खळबळ उडाली जेव्हा अभिनेत्री Corinne Masiero ने अचानक सर्व प्रेक्षकांसमोर आपले कपडे काढले. तिच्या या वागण्यामुळे सर्वांना धक्का बसल्याने ते तिला अशा रुपात पाहून हैराण झाले. अभिनेत्रीला बेस्ट कॉस्ट्युमचा पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर तिला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ती गाढवाच्या कॉस्ट्युममध्ये पोहचली. याच वेळी तिच्या शरीरावर रक्ताचे डाग सुद्धा दिसून आले.(Kim Kardashian ची तिसऱ्या घटस्फोटाची तयारी; लग्नाच्या 6 वर्षानंतर Kanye West पासून वेगळे होण्यासाठी दाखल केला अर्ज)

कॉरिन हिने आपला गाढवाचा कॉस्ट्युम काढला त्यावेळी तिच्या शरीवार रक्ताचे डाग दिसले. यानंतर तिने असे म्हटले की, हेच माझ्याकडील अखेरचा कॉस्ट्युम असून तिने सर्व कपडे उतरवले. अभिनेत्रीचे हे रुप पाहून सर्वांना घाम फुटला.

संपूर्ण न्यूड झाल्यानंतर कॉरिनने जेव्हा पाठ दाखवली त्यावेळी फ्रान्स सरकारसाठी पाठीवर एक संदेश लिहिला होता. कॉरिन हिने त्यात असे म्हटले होते की, 'No Cultre, No Future' खरंतर कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव फ्रान्समध्ये गेले 3 महिने सिनेमागृह बंद होते. याच कारणास्तव फक्त सिने कलाकारच नव्हे तर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचे नुकसान झाले.(Wonder Woman फेम हॉलिवूड अभिनेत्री Gal Gadot हिने व्यक्त केली शाहीन बाग आंदोलनातील 'बिलकिस बानो' यांना भेटण्याची इच्छा)

यानंतर विरोध व्यक्त करत कॉरिनने सर्वांच्या उपस्थितीत तिने कपडे काढून न्यूड होत आपला संदेश सरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढे तिने असे म्हटले की, जर कल्चर नसेल तर कलाकारांचे भविष्य संपणार आहे.