आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात उभ्या आहेत. आतापर्यंत असं कोणतही क्षेत्र नाही, ज्यात महिला काम करत नाहीत. अगदी विमान चालवण्यापासून ते बस चालवण्यापर्यंत महिला आघाडीवर आहेत. रविवारी महिला मोरटमनने (Women Crew) बेंगळुरू ते म्हैसूर (Bengaluru to Mysuru) दरम्यान 'राज्यराणी एक्स्प्रेस' (Rajya Rani Express) ट्रेन चालवली आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
पीयूष गोयल यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय की, 'महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विकास सुरू आहे. 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, बेंगळुरू ते म्हैसूर दरम्यान 'राज्यराणी एक्स्प्रेस' रेल्वे आज सर्व महिला कर्मचार्यांद्वारे चालविली जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक्स्प्रेस गाडी मोटरमन महिला चालवत आहे.' पीयूष गोयल यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. 1 मार्च रोजी महिलांनी रेल्वे गाडी चालवली आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटीझन्सकडून महिलांचे कौतुक होत आहे. (हेही वाचा - ऑस्ट्रेलिया: सापाने गिळलेला टॉवेल डॉक्टरांनी कसा काढला, पहा व्हायरल व्हिडिओ)
Towards Empowering Women: Commemorating the upcoming International Women’s Day, Rajya Rani Express train between Bengaluru & Mysuru was run by an all women crew today.
Watch Railways motorwoman expertly navigate the train through the interiors of our nation. pic.twitter.com/TLPF8PHfma
— Piyush Goyal (@PiyushGoyal) March 1, 2020
पीयूष गोयल यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला एका युझर्सने 'हम भी किसीसे कम नही' हे महिलांनी दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. याअगोदर जळगावमधील एका महिलेने इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाची नोकरीसोडून परिवहन महामंडळात नोकरी स्वीकारली. शुंभागी केदार असं या महिलेचं नाव आहे. शुभांगीने लालपरीचं स्टेअरिंग हातात घेत बस चालवली होती. लालपरी चालवणारी ती महाराष्ट्रातील पहिली महिला ठरली होती.