ऑस्ट्रेलिया: सापाने गिळलेला टॉवेल डॉक्टरांनी कसा काढला, पहा व्हायरल व्हिडिओ
Snake swallows beach towel (Photo Credits: Video Grab)

सापाची सर्वांनाचं भीती वाटते. साप (Snake) दिसला तरी आपल्या तोंडात बाप रे! असा शब्द निघतो. सोशल मीडियावर सापाचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सापाने प्लास्टिकची बाटली गिळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सध्या सोशल मीडियावर असाचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सापाने चक्क लांबलचक टॉवेल (Towel) गिळला आहे. मात्र, डॉक्टरांनी या सापाच्या तोंडातून टॉवेल खेचत त्याचे प्राण वाचवले आहेत. सापाने नेमका टॉवेल कसा गिळला याबाबत कोणालाही कल्पना नाही.

सापाने गिळलेल्या टॉवेल हा समुद्र किनाऱ्यावर वापरण्यात येणार टॉवेल आहे. प्लास्टिक किंवा कचरा माणसासाठी तसचे जनावरांसाठीदेखील किती घातक आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील आहे. (हेही वाचा - Urinary Auto-Brewery Syndrome: महिलेच्या मुत्राशयात युरिनऐवजी तयार होते 'दारू'; जाणून घ्या काय आहे 'युरिनरी ऑटो-ब्रेवरी सिंड्रोम')

मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या सापाचे नाव मॉन्टी असे आहे. या मादी अजगराचे वजन 11 पाऊंड आणि लांबी 10 फूट आहे. या सापाने समुद्र किनारी वापरण्यात येणारा टॉवेल गिळला. या घटनेची माहिती मिळताचं त्या सापाला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून हा टॉवेल काढला आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी टॉवल काढण्यापूर्वी सापाला बेशुद्ध केलं होतं. त्यानंतर त्यांच्या तोंडातून खेचून हा टॉवेल काढण्यात आला. ऑस्ट्रेलियातील एवियन अँड एक्जॉटिक विभागाच्या डॉ. ऑलिव्हिया यांनी या सापावर उपचार केले आहेत. सापाच्या पोटातून हा टॉवेल काढण्यात आला नसता तर त्याचा मृत्यू झाला असता, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.