Students Clean Toilet Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये अनेकदा अशा काही गोष्टी दिसतात, ज्या पाहून लोक थक्क होतात. तर, काही प्रकरणांमध्ये यावर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. कारण, या व्हिडिओमध्ये लहान मुले शाळेतील स्वच्छतागृहाची स्वच्छता करत आहेत. हे दृश्य पाहून सर्वजणचं थक्क झाले असून हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील सोहवनचा आहे. पिपरा कला प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून शाळेतील स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात येत होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करण्याची सक्ती केली जात होती. एक व्यक्ती त्या विद्यार्थ्यांना खडसावत आहे आणि शौचालयाची नीट साफसफाई केली नाही तर ते बंद करू, असे सांगत आहे. कोणीतरी गुपचूप हे प्रकरण कॅमेऱ्यात टिपले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र, शौचालय साफ करणारी व्यक्ती कोण आहे, याची अद्याप ओळख पटलेली नाही. पण, या सगळ्यामागे शाळेच्या मुख्याध्यापकांचा हात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (हेही वाचा - Zomato Intercity Order: ग्राहकाने हैद्राबादहून गुरुग्रामला मागवली बिर्याणी; पॅकेटमध्ये फक्त सालानचा डबा पाहून संतापला ग्राहक)
व्हिडिओ पहा -
Primary School Students Made To Clean Toilet by Principle in Ballia, Uttar Pradesh.
The incident was reported from Pipra Kala Primary School of Sohav Block in Ballia. pic.twitter.com/oYaqqBhFJA
— Ahmed Khabeer احمد خبیر (@AhmedKhabeer_) September 8, 2022
त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी मणिराम सिंह यांनी सांगितले की, त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, गटशिक्षणाधिकार्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या संताप अनावर झाला असून सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.