संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना रशियात (Russia) आणखी एका संकटाची भर पडली आहे. रशियातील उरल भागात असलेले एकतेरिनबर्ग (Ekaterinburg) येथे सोमवारी भीषण वादळ (Hurricane) आले आहे. या वादळात 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय एकतेरिनबर्ग शहरात मोठी वित्तहानी झाली आहे. याच वादळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओत अनेक घरांचे छप्पर उडून गेले आहेत. तसेच एका इमारतीच्या छतावर लावलेला मोबाइल टॉवरही खाली कोसळला आहे. रशियन टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे.
एका व्हिडीओत तर जोरदार वाऱ्यामुळे एका घराचे छत उडून माणसावर पडले आहे. रशियन टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये तर इमारतीच्या छतावर लावलेला मोबाइल टॉवर कोसळत असल्याचे दिसून आले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या वादळाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आली आहेत. हे देखील वाचा- Watch Video: एका तरुणाने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले हैराण
व्हिडिओ-
В Екатеринбурге боженька наслал ураган который ломает антенны 5G. Шах и мат атеисты pic.twitter.com/kfw4jwfmLh
— DIMEX (@DIMEXmd) May 25, 2020
एकतेरिनबर्ग रशियातील चौथा सर्वात मोठे शहर आहे. एकतेरिनबर्गला रशियातील उद्योगाचे केंद्रही मानले जाते. या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून रस्त्यांवर पडली आहेत. यामुळे रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थाही खोळंबली आहे. आधीच जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. यामध्ये लाखोंना कोरोनाची लागण झाली असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशातच नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.