चीन (China) येथे IKEA मधील एका दुकानात चुकुन पॉर्न व्हिडिओ (Porn Film) क्लिप सुरु झाल्याची विचित्र घटना घडली आहे. एका टीव्हीच्या मोठ्या स्क्रिनवर सुरु झालेल्या या अडल्ड फिल्मची (Adult Film) क्लिप सध्या प्रचंड वायर होत आहे. रस्त्यावरुन येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांनी ही व्हिडिओ पाहिली. तर बाजारात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यावर थक्कच झाले.
अशा पद्धतीची घटना पहिल्यांदाच घडली नसून यापूर्वी ही असे झाले होते. 2015 मध्ये केरळ (Kerla) मधील वायनाड (Wayanad) जिल्ह्यातील एका बस स्टँडवर अशी पॉर्न क्लिप सुरु झाली होती. त्यामुळे प्रवासांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तर केबल ऑपरेटरला अटक ही करण्यात आली होती.
अचानकपणे सुरु झालेल्या पॉर्न व्हिडिओमुळे तेथून जाणाऱ्या महिलेने टीव्ही स्क्रिन वृत्तपत्राने झाकण्याचा प्रयत्न केला. काही वेळासाठी हा टीव्ही बंद करण्यात आला होता.या घटनेप्रकरणी एका इंटरनेटवरील प्रँकस्टारचा हात असल्याचे सांगितले जात आहे.अशाच पद्धतीचा एक प्रकार चीनमध्ये घडला होता. त्यावेळी रस्त्याशेजारी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरु झाली होती.