PIB Fact Check: भारत सरकार प्रत्येक गावामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यामातून पैशांची बरसात करणार? जाणून घ्या या FAKE News मागील सत्य
Government Will drop money from helicopters in every town and Village in India? PIB Debunks FAKE news (Photo Credits: @PIBFactCheck)

भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी 15 एप्रिल दिवशी लॉकडाऊन अजून 19 दिवसांनी वाढवून 3 मेपर्यंत वाढवला आहे. या काळात संचारबंदीचे नियम अधिक कडक केले जातील असं सांगत रेल्वे, विमान सेवा बंद ठेवली आहे. देशातील आंतरराज्य, आंतर जिल्हा बंदीदेखील कायम ठेवली आहे. त्यामुळे देशात अडकून पडलेल्या अनेक मजूर, गोर गरिबांमध्ये अस्वस्थता आहे. सध्या बाहेर पडण्याचं सारेच मार्ग बंद झाल्याने अशा घाबरलेल्या लोकांच्या मनस्थितीचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर अनेकजण खोट्या बातम्या, अफवा पसरवत आहे. अशापैकी एक म्हणजे सरकार लवकरच हेलिकॉप्टरमधून पैशांची बरसात करणार. मात्र सरकारकडून असा कोणताही प्रयत्न केला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान PIB Fact Check या ट्वीटर हॅन्डलवरून भारत सरकारने हेलिकॉप्टरमधून पैसे वाटप होणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. Fact Check: Coronavirus Lockdown काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15000 रुपये जमा करणार? PIB ने सांगितले व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य

टेलिव्हिजन चॅनलचा स्क्रीन शॉर्टचा दाखला देत @ajayacharya या ट्वीटर हॅन्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये देशाचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही टॅग करण्यात आलं होतं. अशाप्रकारे फेक माहिती पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

फेक न्यूज बाबत ट्वीट  

PIB Tweet 

भारत सध्या एका बाजूला कोरोना व्हायरसचा लढा लढत आहे तर दुसरीकडे अशा फेक न्यूज, अफवा, खोट्या बातम्यांचं पेव पसरणार्‍यांचा धुमाकूळ सुरू आहेत. दरम्यान नियमित पीआयबीकडून बातम्यांची सत्यता पडताळून त्यांची खरी माहिती लोकांसमोर दिली जाते. आज  देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,380 झाली असून त्यापैकी 1489 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोविड 19 च्या संसर्गाने आतापर्यंत तब्बल 414 रुग्णांचा बळी घेतला आहे.