Mumbai Innova Accident Video: मुंबईतील चांदिवली परिसरात 14 वर्षीय मुलाने चालवली पालकांची SUV; गेटमधून बाहेर निघताच दिली ज्येष्ठ नागरिकाला धडक, Watch Viral Video
Mumbai Innova Accident Video (PC - Twitter/@ChandivaliCCWA)

Mumbai Innova Accident Video: मुंबईतील चांदिवली परिसरात (Chandivali Area) एका 14 वर्षीय मुलाने आपल्या पालकांची गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एसयूव्हीने रस्त्याने चालत असताना मुलगा ज्येष्ठ नागरिकाला धडकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा मुलगा त्याच्या पालकांची एसयूव्ही चालवत होता. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील एका कॉलनीच्या गेटमधून एक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्येष्ठ नागरिक सकाळी बाहेर येऊन रस्त्यावर फेरफटका मारत होते. त्याच इमारतीच्या गेटमधून एसयूव्हीही बाहेर आली. एसयूव्हीने प्रथम कॉलनीच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या ऑटोरिक्षाला धडक दिली. ऑटोला धडक दिल्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या वृद्ध व्यक्तीला धडक दिली.

तथापी, ऑटोला आणि वृद्ध व्यक्तीला धडक देऊन या मुलाने आपली एसयूव्ही वेगात घेऊन तेथून पळ काढला. गेटमधून बाहेर काढून गाडी डावीकडे वळवल्यानंतर मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि जोरात वळण घेत त्याने ऑटोला आणि रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या वृद्धाला धडक दिली. (हेही वाचा - Boat Capsizes in Bagmati River: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, 10 मुले बेपत्ता)

या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या व्यक्तीसा जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने या वृद्ध व्यक्तीला पुढील तीन महिने पूर्ण बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मुलाच्या पालकांवर कारवाई केली. आई-वडिलांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर मुलाची सुटका करण्यात आली आहे.