जगभर पाय पसरवलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्व देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची (Pakistan) प्रकृती अधिकच खालावली. शनिवारपर्यंत देशातील 5,000 लोक या विषाणूच्या संसर्गाचे बळी ठरले आहेत. इतकच नाही तर तेथील डॉक्टरांनीही हालत खराब आहे. प्रांतीय राजधानी क्वेटामध्ये तरुण डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांनी कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करणार्या 13 डॉक्टरांना या प्राणघातक आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन केले. अनेक डॉक्टरांना मारहाणही करण्यात आली. अशा स्थितीतही डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी रविवारी पाकिस्तानमधील रुग्णालयाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर्स कोरोना संक्रमित रूग्णांचा उत्साह वाढवण्यासाठी नाच करताना दिसत आहे. (Covid-19: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पत्नी आणि ड्राईव्हरला कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागचे व्हायरल सत्य)
Corona....जहां भी हो सुन लो 😂😂 चिट्टा चोला !! #nayapakistan pic.twitter.com/BVUznyxEW5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 12, 2020
गंभीरने या व्हिडिओवर एक मजेदार कॅप्शन दिले आणि लिहिले की "कोरोना... तू जिथे आहेस तिथे ऐक, चिट्टा चोला!" ज्या गाण्यावर डॉक्टर्स नाचत आहेत त्या गाण्यातील 'चिट्टा चोला' हे शब्द आहेत. या व्हिडिओवर गंभीरने "न्यू पाकिस्तान" असे कॅप्शन लिहिले. त्याच्या या व्हिडिओवर लोकं बरेच मजेदार कमेंट करत आहेत. पाहा हा व्हिडिओ:
पाकिस्तानमध्येही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात संक्रमणामुळे आजवर 88 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे की पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढून 5,170 झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर असे म्हटले आहे की 1,026 रूग्ण बरे झाले आहेत, तर 37 जणांची प्रकृती गंभीर आहे. अशा परिस्थितीत चीन देशाला साथीच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी अधिक वैद्यकीय मदत पाठवित आहे. देशात तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाउन असूनही नवीन रुग्णांमध्ये सातत्याने वाढत होत आहे. लॉकडाउन मंगळवारी (14 एप्रिल) संपणार आहे. लॉकडाउन वाढवायचा की नाही याचा सोमवारी (13 एप्रिल) निर्णय घेतला जाण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, लॉकडाउन वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे.