Pakistani Airline Pilot Cleaning Windscreen (फोटो सौजन्य - X/@erbmjha)

Pakistani Airline Pilot Cleaning Windscreen: तुम्ही कधी पायलटला उड्डाण करण्यापूर्वी त्याचे विमान साफ ​​करताना पाहिले आहे का? तुमचं उत्तर कदाचित नाही असंच असणार आहे. कारण, अशी घटना असामान्य आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावालं. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी विमान कंपनीचा पायलट हाताने विंडस्क्रीन साफ ​​करताना दिसत आहे.

विंडस्क्रीन साफ ​​करण्यासाठी एक एअर पायलट विमानाच्या खिडकीतून बाहेर वाकून विंडस्क्रीन साफ करत आहे. सुरक्षित उड्डाण सुनिश्चित करण्यासाठी पायलटने विमानाची विंडस्क्रीन साफ केली. या व्हिडिओमध्ये एअरबस 330 200, पाकिस्तान आणि जेद्दाह, सौदी अरेबिया दरम्यान उड्डाण करणारे आंतरराष्ट्रीय विमान दिसत आहे. (हेही वाचा - Bonza Airline Abruptly Cancels All Flights: ऑस्ट्रेलियन एअरलाइन बोन्झाने अचानक रद्द केली सर्व उड्डाणे; हजारो प्रवासी विमानतळावर अडकले)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी या घटनेचा समाचार घेतला आणि पाकिस्तानी एअरलाइनच्या दुर्दशेवर टिपण्णी केली. त्यांच्याकडे सफाई कामगारांना देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत असं एका X वापरकर्त्यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका युजर्सने लिहिलं आहे की, 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा पायलट कॉकपिट आणि विंडस्क्रीन साफ ​​करत आहे. त्याची आर्थिक स्थिती अशी आहे,' असं म्हटलं आहे. (हेही वाचा - Parcel Arrived After Two Years: दोन वर्षांपूर्वी ऑर्डर केलेल्या कुकरची Amazon ने आत्ता केली Delivery, ग्राहक संतापला)

पाकिस्तानी एअरलाइनच्या पायलटने उड्डाणाआधी साफ केली विमानाची विंडस्क्रीन, पहा व्हिडिओ - 

याशिवाय, अनेक युजर्संनी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर मजेशीर इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. यात पायलट समोरचे दृश्य साफ करताना दिसले होते.