Sharad Pawar Grass Painting| Photo Credits: Twitter/ Yashwant_M_YCM

उस्मानाबाद येथील निपाणीमध्ये (Nipani) राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे एक लाख 80 हजार स्क्वेअर फूट जागेवर भव्य स्वरूपात ग्रास पेटिंग साकरण्यात आले आहे. सध्या सोशल मीडीयावर शरद पवारांचे हे ग्रास पेटिंग व्हायरल होत आहे. दरम्यान 12 डिसेंबर दिवशी शरद पवारांचा 80 वा वाढदिवस पार पडला. त्याच औचित्य साधून हे खास ग्रास पेटिंग बनवण्यात आलं आहे. 200 किलो अळीव, 300 किलो मेथी, 40 किलो गहू, 20 किलो ज्वारी आणि हरभरा असे धान्य पेरणीसाठी वापरले आहे. लातूर येथे तयार झाले देशातील पहिले Grass Painting; 7 दिवस गवत उगवून साकारले शिवाजी महाराज (Video).

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी स्थित मंगेश निपाणीकर या शेतकरी तरूणाने शरद पवारांचे हे ग्रास पेटिंग साकारले आहे. शरद पवारांचे हे ग्रास पेंटिंग बनवण्यासाठी जमिनीची विशेष प्रकारेमशागत करून सलग 15 दिवसांच्या मेहनतीनंतर हे ग्रास पेंटिंग बनवण्यात आले आहे. दरम्यान शरद पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिवस म्हणून शेतकरी साजरे करतात.

शरद पवार यांचे ग्रास पेंटिंग 

निपाणीमध्ये यापूर्वी शिवाजी महाराजांचेदेखील ग्रास पेटिंग बनवण्यात आले होते. त्याचे फोटोदेखील सोशल मीडीयामध्ये चांगलेच व्हायरल झाले आहेत. शरद पवारांची ही कलाकृती साडे चार एकर जमिनीवर साकारली आहे. हे ग्रास पेंटिंग साकरण्यासाठी 600 बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे.