Gutkha Ice Cream: गुटखाप्रेमींसाठी आली नवीन आईस्क्रीम! सोशल मीडियावर व्हायरल होतोय विमल टाकून केलेल्या आईस्क्रीमचा व्हिडिओ (Watch Video)
Gutkha Ice Cream (PC - X/@desimojito)

Gutkha Ice Cream: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही जण पराठ्यावर प्रयोग करतात. तर कोणी पकोड्यांचा प्रयोग करून चॉकलेट पकोडे बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. एवढेच नाही तर चहावर अनेक प्रयोग करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात, जे पाहिल्यानंतर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात.

गुटखा आईस्क्रीम -

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमल टाकून त्यात व्हॅनिला आइस्क्रीम टाकतो आणि नंतर हे मिश्रण मिक्स करतो. काही वेळ मिक्स केल्यानंतर तो ते एका प्लेटमध्ये पसरवतो आणि रोलप्रमाणे आइस्क्रीम तयार करतो. यानंतर, तो आईस्क्रीम दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवतो, त्यावर चॉकलेट, बिस्किटे तसेच विमल ठेवतो आणि सजवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Papad Making Viral Video: OMG! चक्क पायाच्या साहाय्याने बनवला जातोय पापड, व्हिडिओ पाहून नेटीकरी हैराण, पहा व्हिडिओ)

पहा व्हायरल व्हिडिओ -

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @desimojito नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे, बोला जुबान केसरी. आणखी एका युजरने लिहिले आहे की, हेल्थी जुबान केसरी. तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, Desert खाल्ल्यानंतर थुंकावे लागते का? एका यूजरने लिहिले आहे की, केशरसोबत विमल आईस्क्रीम.