Papad Making Viral Video: OMG! चक्क पायाच्या साहाय्याने बनवला जातोय पापड, व्हिडिओ पाहून नेटीकरी हैराण, पहा व्हिडिओ
Papad Making Viral Video (PC - Instagram)

Papad Making Viral Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. लोकांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ शेअर केले जातात आणि ते व्हायरलही होतात. याशिवाय असे काही व्हिडिओही व्हायरल होतात ज्यामध्ये लोक काही विचित्र कृत्य करताना दिसतात. तुम्ही सर्वांनी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात विविध प्रश्न निर्माण होऊ शकतात.

पापड बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल -

पापड (Papad) हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही पदार्थाची चव वाढवतो. भारतातील लोकांना पापड खायला खूप आवडते. तुम्हालाही पापड खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने पीठ उन्हात पसरवून थोडे वाळवलेले दिसत आहे. यानंतर पापड पूर्णपणे उन्हात वाळवण्याआधी ती त्याला गोल आकारात कापत आहे. यासाठी महिला कोणत्याही मशीनचा वापर करत नसून वाटी वापरत आहे. आणि हो, या वाटीवर पाय देऊन ती पापड कट करत आहे. यामुळे पायाचा स्पर्श या पापडांना झालेला दिसत आहे. पण याची कसलीही किळस या महिलेला येत नाही. पापड पायाच्या साहाय्याने कट करून ती ते उन्हात पसरवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा -Dead Ants In Samosa Video Viral: समोसा कसला! मेलेल्या मुंग्यांचे वारुळच; दिल्ली येथील महाविद्यालयातील व्हिडिओ व्हायरल)

व्हायरल व्हिडिओ पहा -

 

View this post on Instagram

 

A post shared by Kualuh Leidong (@kualuhleidong)

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर kualuhleidong नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो वृत्त लिहिपर्यंत 71 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, 'हे अन्न आजीच्या हाताचे नाही तर तिच्या पायाने बनवलेले आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, आजपासून पापड खाणे बंद झाले. तिसऱ्या यूजरने लिहिले आहे, आज नंतर मी पापड खाणार नाही.