New Facebook Rules Fact Check: फेसबूक वापरकर्त्यांची खाजगी माहिती धोक्यात? जाणून घ्या या मागील व्हायरल सत्य

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात अनेक घटना समोर आल्या आहेत. यात उद्यापासून फेसबूक (Facebook) वापरकर्त्यांची खाजगी माहिती धोक्यात असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच नव्या निमयानुसार, फेसबूक त्यांच्या वापरकर्त्यांचे फोटो वापरण्यास सुरुवात करणार आहे. उद्यापासून वापरकर्त्यांची प्रत्येक गोष्ट सार्वजनिक होणार आहे. परंतु ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे फेसबूक वापरकर्त्यांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

लॉकडाउन असल्यामुळे अनेकजण घरातच थांबणे पसंत करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच चुकीच्या माहितीचाही अधिक प्रसार होऊ लागला आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहले आहे की, फेसबूकने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे ते आपल्या वापरकर्त्यांची खाजगी माहिती सार्वजनिक करणार आहे. तसेच आपल्या वापरकर्त्यांच्या फोटाचा वापर करण्यास सुरुवात करणार आहे. चॅनेल 13 न्यूजमध्ये फेसबूकने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्याची माहिती देण्यात आली, असेही सांगितले गेले आहे. परंतु, ही सर्व माहिती चुकीची असल्याचे समजत आहे. वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांना बळी पडू नये. हे देखील वाचा- Fact Check: मुंबई पोलिसांनी दिल्या नाहीत 'त्या' मार्गदर्शक सूचना; सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशाबाबत Mumbai Police यांचे स्पष्टीकरण

पोस्टमध्ये काय लिहले?

 

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंट खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांमध्ये संभ्रण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी 458 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, 250 जणांना अटक करण्यात आली आहे.