Pune Viral Bike Stunt: रिल्ससाठी पुण्यातील तरुणीची खतरनाक स्टंटबाजी, Video पाहून नेटकरी संतापले
pune bike stunt video pc TWITTER

Pune Viral Bike Stunt: तरुणांची हुल्लडबाजीचे नवे कारनामे रोज समोर येत असतात. रिल्स बनवण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. त्यात पुण्यातील एक तरुणी तिच्या स्टंटबाजीमुळे चर्चेत आली आहे. बाईकसोबत स्टंट करत असताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असताना, तरुणीने जीवाची पर्वा न करता बाईक स्टंट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ एकाने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला आहे. ही घटना हडपसर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा- पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने हात न पकडताच, एका बाजून बसून रिल्सचा व्हिडिओ शूट केला आहे आखो मे बसे हो तुम या गाण्यावर तीनं व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओला पाहून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस या तरुणीवर कारवाई करणार का ? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. रिल्स बनवण्यासाठी तीने यामाहा गाडी चालवताना दिसत आहे. बाईक बसताना तिने दोन्ही हात सोडले आहे. एवढेच नाही तर दोन्ही पाय देखील एकाच बाजूला टाकून बसली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे.

पहा स्टंटबाजीचा व्हिडिओ

उपमुख्यमंत्री सोबत फोटो 

अनेकांनी पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माधवी कुभार राजे असं तरुणीचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर तीचा चाहता वर्ग खुप मोठा आहेत. इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील तिचा फोटो आहे. पुण्यात काही दिवसांपासून  अपघाताचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.